परभणी/असोला (Parbhani):- मागील वर्षी सुरुवातीच्या काळात अल्प पावसामुळे (Raining) आणि त्यानंतर अतिवृष्टी (heavy rain) व वादळी वार्यामुळे कापुस व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान होवून शेतकर्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र शासन निर्णया नुसार पिक विम्यासाठी नुकसानीच्या ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे तक्रार सादर न करता आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना पिक विमा देण्यापासून वंचित ठेवल्यामुळे शनिवार ८ जून रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने असोला पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आम आदमी आक्रमक
रब्बी हंगाम २०२३ -२४ मध्ये शेतकर्यांना हरभरा पिकांची दुबार पेरणी करावी लागली. तसेच काढणीच्या अवस्थेत असतांना आवकाळी अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा यामुळे प्रचंड नुकसान होवून हातचे पिक गेले. मात्र नुकसानीची तक्रार ऑनलाईन (Online)देण्यासाठी निरीक्षरता, तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे व पोर्टलवर येणार्या तांत्रीक अडचणींमुळे(Technical difficulties) अनेक शेतकर्यांना ७२ तासांच्या आत तक्रार देता आली नाही. त्यामुळे हरभरा व कापुस पिकाचे नुसकान झालेल्या शेतकर्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही. तक्रार केलेल्या व न केलेल्या शेतकर्यांचे नुकसान सारखेच झाले असल्यामुळे त्यांना ही पिक विमा (Crop insurance) तात्काळ देण्याचा आदेश देण्यात यावा. या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे(Aam Aadmi Party) जिल्हाध्यक्ष सतीश चकोरे यांच्या नेतृत्वाखाली असोला पाटी येथे शनिवार ८ जून रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह सावित्री चकोर, सुनिल देशमुख, कल्याण क्षीरसागर, प्रल्हाद झाडे, रामेश झाडे, रामभाऊ राऊत, कुणाल गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाला देण्यात आले. यावेळी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलकांचा आक्रमक पावित्रा
आम आदमी पक्षाच्या वतीने असोला पाटी येथे पिक विमा मिळुन देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलन स्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला. महसुल विभागाकडे(Department of Revenue) निवेदन देण्याची प्रशासनाने आंदोलकांना विनंती केली असता, जो पर्यंत जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येवून भेट घेत नाहीत. तो पर्यंत निवेदन देणार नसल्याचा आंदोलकांनी पावित्रा घेतला. दरम्यान पोलीसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले आहे.