गोंदिया (Stork bird) : महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी (Stork bird) गोंदिया जिल्ह्यात आहेत. मात्र प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारसांच्या संवर्धन करण्याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सारससुद्धा आता माळढोक पक्ष्याप्रमाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (Wildlife Department) नुकत्याच झालेल्या सारस गणनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ सारस पक्षी कमी झाले आहे. तर गेल्या पाच वर्षांत सारस पक्ष्यांची संख्या ४५ वरून २८ वर आली आहे. त्यामुळे सारसांचा माळढोक होऊ द्यायचा नसेल तर (Stork bird) सारस संवर्धनासाठी आत्ताच पाऊल उचलण्याची गरज आहे.त्यातच महाराष्ट्रात फक्त ३२ सारस पक्षी उरले आहेत.
जिल्ह्यात सारस पक्ष्यांच्या संख्येत घट
पर्यावरण (environment) आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी सातत्याने कार्यरत सेवा संस्था आणि वन व (Forest Department) वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २३ ते ३० जूनदरम्यान गोंदिया, बालाघाट, भंडारा तीन जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूण ७०-८० ठिकाणी सेवा संस्थेचे सदस्य, स्थानिक शेतकरी, सारस मित्र स्वयंसेवी आणि वनविभाग गोंदियाच्या कर्मचार्यांनी सारस गणना यशस्वीरीत्या पूर्ण केली. यासाठी ३९ चमू तयार करून सारस पक्ष्यांच्या विश्रांतीच्या जागेवर पहाटे ४.४५ वाजे ते सकाळी ९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर थेट जाऊन गणना करण्यात आली. या सारस गणनेत जिल्ह्यात २८ सारस पक्ष्यांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत (Stork bird) सारस पक्ष्यांची संख्या घटली असून, ही सारसप्रेमींसाठी निराशाजनक बाब आहे, तर गोंदिया जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख असलेल्या सारस पक्ष्यांचीसुद्धा माळढोक होण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याने निश्चितच ही धोक्याची घंटा आहे. विशेष सारस संवर्धनाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र यानंतरही यात फारशी सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे.
जिल्हानिहाय सारस पक्ष्यांची संख्या
सारस पक्षी जिल्ह्याचे वैभव मानले जाते. यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री बडोले यांच्या नेतृत्वात सारस महोत्सव साजरा करण्यात आला होता. शिवाय न्यायालयानेही सारस पक्ष्यांच्या संवर्धनावर जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. परंतु, जिल्ह्यातील (Stork bird) सारस संपदेला ग्रहण लागले आहे. सन २०२० मध्ये ४५ सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. सन २०२१ मध्ये ३९, २०२२ मध्ये ३४, २०२३ मध्ये ३१ तर सन २०२४ मध्ये फक्त २८ सारस पक्षी शिल्लक राहिले आहेत. त्याचप्रमाणे लगतच्या बालाघाट जिल्ह्यात ४५, भंडारा जिल्ह्यात ४ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.
उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
सारस पक्ष्यांचे (Stork bird) संवर्धन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासन आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. पण तिन्ही जिल्ह्यात उपाययोजना केवळ कागदावर राबविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सारस गणनेत यांचा सहभाग
सारस गणनेच्या संपूर्ण मोहिमेमध्ये सेवा संस्था अध्यक्ष सावन बहेकार, भरत जसानी, शशांक लाडेकर, अविजित परिहार, कन्हैया उदापुरे, सुशील बहेकार, प्रतिक बोहरे, पिंटु वंजारी, गौरव मटाले, सौरभ घरडे, दानवीर मस्करे, कमलेश कांमडे, प्रशांत मेंढे, प्रविण मेंढे, हरगोविंद टेंभरे, बबलू चुटे, कैलाश हेमने, जितेंद्र देशमुख, सोमेश्वर कोल्हे, डिलेश कुसराम, लोकेश भोयर, शेरबहादुर कटरे, राहुल भावे, रतिराम क्षीरसागर, गणेश बावनकर, शिव भोयर सेवा संस्थेच्या सर्व सदस्यांनी गणनेला यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.