हिमायतनगर (Nanded):- हिमायतनगर तालुक्यातील सोनारी, करंजी, सरसम, जवळगांव, खैरगाव दुधड, वाळकेवाडीसह तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ९ जुन रोजी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तापमान (temperature)वाढलेलेच असतांना अचानक वातावरणात बदल होवुन ढगाळ वातावरण (Cloudy weather)निर्माण झाले आणि तीन ते चार वाजण्याच्या सुमारास जवळपास एक तास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे झोडपून काढले आहे. विजेच्या कडकडाटासह भयानक वादळीवाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे घरावरील व झोपड्या वरील पत्र उडाल्याने एकच तारांबळ उडाली.