परभणी (Parbhani):- शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी परभणी शहर महापालिका(Parbhani City Municipality) पथविक्रेता फेरीवाला समितीच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महापालिका हद्दितील पथविक्रेता यांच्या विरोधात राजकीय हेतू उद्देशाने त्याना अनाधिकृत फेरीवाले ठरवत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. पथविक्रेता हे रात्रंदिवस राबून आपला उदरनिर्वाह करतात. न्यायालयाच्या निर्देशानुसार टाऊन वेंडिंग कमिटी बनवावी, त्यानंतर झोन बनवून पुढील कारवाई करावी. शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करावी, स्ट्रीट वेंडर्स कायद्यानुसार योजना प्रस्तावित करावी, तक्रार निवारण समिती स्थापन करावी तसेच पथविक्रेत्यांना सुरक्षा द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सय्यद मोईनोद्दिन, शेख सलीम, सुरेश प्रधान, रामेश्वर अवरगंड, जुबेर युनूस, सचिन अंबिलवादे, साजेद सलीम, गौतम भराडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.