उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
मंगरूळपीर (Farmer debt relief) : निवडणूक काळात शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देऊन सत्तेत विराजमान झालेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या वेदनांचा विसर पडला आहे. याचा पर्दाफाश राज्यातील करत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू असा निर्धार घेऊन किसान ब्रिगेडच्यावतीने शेतकऱ्यांच्या (Farmer debt relief) कर्जमुक्तीसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले असून, त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरून छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १४ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
सदर निवेदनाचा आशय असा की, विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान महाविकास आघाडी,महायुती या दोन्ही आघाडीच्या वतीने आम्ही सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनावरच भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची मते घेऊन सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणालो नाही. अशी भाषा करण्यात आली. याचा शेतकरी कांही संघटनाकडून निषेध नोंदविण्यात आला. याला जुमानेल ते सरकार कसले, यावर मार्ग काढत किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी किसान ब्रिगेडच्यावतीने राज्यभरात मागेल त्यालाच, गरज त्यालाच (Farmer debt relief) कर्जमुक्ती अंतर्गत किसान कर्जमुक्ती अर्ज भरणा सुरू केला.
या मोहिमेत सामील होऊन वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज भरून कर्जमुक्तीसाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी दिला आहे. तरी शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती साठी अर्ज करण्यात आले आहे. यावेळी मंगरूळपीर तालुक्यातील जनुना खुर्द येथील शेतकऱ्यांनी सर्वाधिक (Farmer debt relief) कर्जमुक्तीची अर्ज सादर केले असून. यावेळी शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
