मानोरा (Student Death) : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील पंचाळा रस्त्यावर असलेल्या बंधाऱ्यात पडून दहावीत शिक्षण घेत असलेला १७ वर्षीय विद्यार्थी सुनिल अशोक होडगीर यांचा २७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
पोहरादेवी येथील किसनराव विद्यालयात दहावीत शिक्षण घेणाऱ्या सुनिल होडगीर वय १७ वर्ष वयाच्या युवकांचा शुक्रवारी पोहरादेवी ते पंचाळा रस्त्यावर असलेल्या बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली सदर घटना वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी तहसीलदार डॉ संतोष येवलीकर व ठाणेदार प्रविण शिंदे टिमसह रवाना झाले. प्रेत बंधाऱ्यातून काढून उत्तरीय तपासणी करिता मानोरा येथे पाठविण्यात आले.मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून पोलीस (Student Death) आकस्मित मृत्युंची नोंद घेऊन अधिक तपास पोलीस करीत आहे.