मानोरा (Washim) :- तालुक्यातील हळदा – जगदंबानगर येथील १० वर्षीय विद्यार्थी पांडुरंग चव्हाण या चिमुकल्याला १७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास शेतातून घरी येत असताना सापाने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला. विद्यार्थी पांडुरंग मंथन चव्हाण हा गावातच ३ रीत शिक्षण घेत आहे. सोमवारी पाऊस आल्याने मंगळवारी कपाशी लागवड करण्यासाठी संपूर्ण कुटुंब शेतात गेले होते. यात मृतक पांडुरंग सुध्दा आई व वडिलांसोबत शेतात गेला होता. शेतातील कामे आटोपून सायंकाळी घरी येत असताना सापाने चावा घेतल्याची घटना घडली. सदर बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच सामान्य ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषीत केले. एकुलता एक मुलगा सर्पदंशाने (Snakebite) मृत्यूमुखी पडल्याने अल्प भूधारक शेतकर्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन संपूर्ण गाव परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक पांडुरंगाच्या पश्चात कुटुंबात आई वडील व एक बहीण असल्याचे समजते
Washim : सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू
You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics


