विद्यार्थ्यांचा पूराच्या पाण्यातून सायकलीने जीवघेणा प्रवास
देशोन्नती वृत्तसंकलन
अंजनगाव सुर्जी/चौसाळा (Student fatal journey) : विद्यार्थांना चौसाळा या गावाच्या पुरातून जीवघेणा प्रवास करीत पाठीवर दप्तरं आणि (Student Education) सायकलीने पुरातून मार्ग काढीत शाळेतून घरी व घरून शाळेत जावे लागत आहे. गावातील ग्रामस्थ मुकुंद प्रमोद काळमेघ यांनी नागरिकांच्या वतीने तक्रार दिलीय. चौसाळा येथील बेलगंगा नदीच्या पुरामुळे विद्यार्थ्यांना नाहक होत असलेला त्रास (Student fatal journey) विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय. पंचक्रोशीतील विद्यार्थी, जसे चिंचोना, निमखेड, हिरापूर, खिराळा येथील विद्यार्थी; तसेच सावरपाणी सहित अन्य गावांच्या आदिवासी भागातील विद्यार्थी चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालयात शिकायला येतात.
गेल्या आठ दिवसांत सलग ३८४ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी – नाले तुडुंब भरले आहेत. अशातच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा येथून बेलगंगा नदीच्या पुरातून पाणी वाहत असताना विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन पूरातून सायकलीने जीवघेणा प्रवास करून मार्ग काढीत शाळेतून घरी व घरून शाळेत जावे लागत आहे. (Student fatal journey) विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ व छायाचित्र समाजमाध्यमांवर सार्वत्रिक होताच सर्वत्र लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनावर टीका होत आहे.
सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे शाळेत जात असताना सर्व विद्यार्थी एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि सायकलीने पुरातून मार्ग काढीत आहेत. (Student Education) शिक्षणासाठी त्यांना चौसाळा येथील शेवंताबाई काळमेघ विद्यालयात दररोज जावं लागतं. चौसाळा या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत नवीन पूल बांधला गेलाय.
वास्तविक हा पूल श्रीकृष्ण मंदिरच्या पुढे निमखेड रस्त्याला जुळायला हवा होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, तसे न झाल्याने मोठा पाऊस आला की भरपूरातून (Students school) विद्यार्थ्यांना मार्ग काढीत जावे लागते. वारंवार गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व (Administration careless) जिल्हा प्रशासन यांच्या जवळ मागणी केलेली असतानाही त्यांच्या मागणीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही. विद्यार्थ्यांचा असा व्हिडिओ समोर आल्याने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका होत आहे. पंचवीस वर्षांत एखाद्या भागात प्रवाशांसाठी सोयीस्कर पूल होत नसेल तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.