हिंगोली (Hingoli) :- वसमत तालुक्यातील कोर्टा येथे अभ्यासाच्या तनावातून एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडल्याने कुरूंदा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
अभ्यासाच्या तणावामुळे बीएससी च्या विद्यार्थिनीची आत्महत्या
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कोर्टा येथील अयोध्या ज्ञानेश्वर रणमाळ (२५) ही औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथील असून बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. अभ्यासाच्या तानतनावामुळे तीने १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळच्या सुमारास अयोध्याची आई शेतातून आल्यानंतर तिला अयोध्याचा मृतदेह (Dead Body) गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून येताच तिने हंबरडा फोडला. यावेळी आजू बाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेतली. याबाबतची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, पोलिस उपनिरीक्षक आगलावे, जमादार भगिरथ सवंडकर, एल.बी. पोले यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन (Autopsy) वसमत रुग्णालयात उपजिल्हा करण्यात आले. मयत अयोध्या हिच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात आत्माराम कुंडलिक कदम यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सवंडकर हे करीत आहेत. मयत अयोध्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.