तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार!
मानोरा (Students Felicitation) : विद्यार्थी जीवनात अभ्यासातील सातत्य, प्रामाणिक प्रयत्न व मेहनत जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली, तर प्रत्येक परीक्षेत चांगले यश संपादन करून आई-वडिलांचे महाविद्यालयाचे नाव विद्यार्थी कमावू शकतात व इतरही विद्यार्थ्यांना त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन आपला मार्ग निश्चित करता येतो, असे प्रतिपादन ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील यांनी केले. ते दिनांक 7 ऑगस्टला मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित!
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे, संचालक ज्ञानदेवराव भोयर, पुरुषोत्तम पाटील रोकडे, विद्याभारती महाविद्यालय कारंजा लाडचे प्राचार्य डॉ पाटील सर, मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस ठाकरे, मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार नैना पोहरकर, मॅडम सांस्कृतिक समितीचे संयोजक प्रा. डॉ. अली आदी मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालय गेल्या 20 वर्षापासून तालुक्यातील दहावी, बारावी, पदवी परीक्षा व स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या तालुक्यातील गुणवंताचा सत्कार करीत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा टक्का हा मानोरा तालुक्यातील वाढला असे प्रतिपादन प्रस्ताविकातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस ठाकरे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विद्याभारती महाविद्यालय कारंजा लाडचे प्राचार्य डॉ एम पाटील व मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण व दहावीच्या परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 70 विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळवणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्रा. डॉ अविनाश निळे, आपल्या कल्पकतेने ऑनलाइन टेस्ट साठी ॲप डेव्हलप करणारा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी सुरज झळके यांचा सुद्धा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समितीच्या सदस्य प्रा स्नेहल ढवळे मॅडम, व प्रा. सुनील काळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अली यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सांस्कृतिक समितीचे सदस्य प्रा. डॉ. राहुल काजळकर, प्रा गणेश भोयर, प्रा. कु. विशाखा पोहरे त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक (Professor) वर्ग व विद्यार्थी (Students) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
