कोरची (Chandrapur Botanical Garden) : कोरची येथील पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची च्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट अंतर्गत सहशालेय उपक्रमामध्ये शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभूती देणे हे शाळेचे प्राधान्यक्रम कार्य राहिले पाहिजे अशाच सहशाले उपक्रमांतर्गत बाहेरील परिसराची प्रत्यक्षरीता माहिती मिळावी म्हणून चंद्रपूर येथील (Chandrapur Botanical Garden) श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला वाव मिळावा, नवीन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून बॉटनिकल गार्डन खूपच उपयुक्त ठरते. महामंडळाच्या लाल परी बसणे क्षेत्रभेट करण्यात आली. विज्ञानाचे नवनवीन मॉडेल चे विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले . गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध (Chandrapur Botanical Garden) वनस्पतीचे खोड व खोडाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समजून घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची नदी वैनगंगा प्रत्यक्ष नदी व नदीचे रुंद पात्र याविषयी प्रत्यक्ष दर्शन व नदीचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले. वैनगंगा नदी विषयीची माहिती मारोती अंबादे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान चंद्रपूर येथे डब्बा पार्टी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने जेवनाचा आस्वाद घेतला. प्रवेशद्वारावरून संपूर्ण उद्यानाचे दर्शन झाले.
मत्स्यालय म्हणजेच फिश पार्क मध्ये विविध माशांचे प्रकार व त्यांचा निवारा समुद्रातील तळातील वनस्पती या विषयी माहिती मिळाली.आरती चांदेकर व कांता साखरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती समजावून दिली. ओपन सायन्स लॅब मध्ये विद्यार्थ्यांनी खूप मज्जा केली. तेथील वस्तू विषयी माहिती प्रमोदिनी काटेंगे व मंदा आवारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. (Chandrapur Botanical Garden) विविध वनस्पती व गुलाबाचे प्रकार, शंख घर, वनस्पती पासून बनवलेली बाहुली व कलाकृती याविषयीची माहिती शेवंता कवडो व सुरेखा काटेंगे यांनी दिली. काही विद्यार्थ्यांनी मिनी ट्रेन वरून बगीच्याची सफारी केली घसरगुंडी स्लाइडिंग झुले, सिसा अशा विविध खेळातून विद्यार्थ्यांनी खूप खूप मज्जा केली. पाण्याचा फवारा पाहून विद्यार्थी खूप आनंदित झाले. ठिबक सिंचन व तुषार सिंचन याविषयी प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती मिळाली.
माननीय अमित दास साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरची यांनी हिरवी झेंडी दाखवून क्षेत्रभेटीचा सुखद प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय मनीषा राष्ट्रपाल नखाते,उपाध्यक्ष माननीय मुनेश्वर देशमुख, माननीय लतिका ताई ठलाल, माननीय रामसुरामजी काटेंगे ,सिद्धार्थ राऊत, केशवराव भोंडे, फत्तेसाय होळी, प्रकाश उईके,लोमेश देवांगन, सुरेश मेश्राम, लुमेश्वर बनपूरकर, सुरेश जमकातन, चंद्रशेखर अंबादे, बाबुलाल शेंडे आणि सर्व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत प्रवासाची सुरुवात करण्यात आली. सर्व पालकांनी सुखद प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. तिन्ही बसेस सर्वांना घेऊन कोरचीला सुखरूप परतले.
शैक्षणिक सहली करता मुख्याध्यापक मंदा आवारी मॅडम, प्रमोदिनी काटेंगे,कांता साखरे, आरती चांदेकर, मारोती अंबादे, शेवंता कवडो, सुरेखा काटेंगे यांनी परिश्रम घेतले दुपारच्या ना्सत्या मध्ये केळी आणि चिवडा देण्यात आला . इयत्ता पहिली ते सातवी च्या विध्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी झाले. बसेस परत येईपर्यंत पालक वर्ग बसस्टॅण्ड वर म्हणजे च शाळेच्या परिसरामध्ये आपल्या पाल्याची वाट बघत होते.




