नांदेड(Nanded) :- शाळेतून घरी परततांना अचानक ओढ्याला पुर आल्याने रस्त्यात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी एकमेकांच्या हाताची साखळी करून पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले.
पूर आल्याने नागरिकांनी साखळी करून विद्यार्थ्यांना काढले सुखरूप बाहेर
सदर घटना अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथे घडली. नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थी(students) सुखरूप घरी परतल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तसेच सदर घटनेची माहिती सोशल मीडियावर(Social media) व्हायरल होताच वाढत्या पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहणे गरजेचे होते. तर वाहत्या प्रवाहातून विद्यार्थ्यांना काढण्याची केलेली घाई विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतली असती अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत असून एक मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.