पुसद(Pusad) :- विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुसद महसूल विभागाच्या (Department of Revenue) पुढाकाराने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एकाच दिवशी सर्व प्रकारच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येत्या ६ जून रोजी उपविभागातील प्रत्येक माध्यमिक शाळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद उपविभागातील दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट व इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गैरसोय(Disadvantage of students) व धावपळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला पुढील प्रमाणे
विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, एसइबीसी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, इडब्ल्यूएस प्रमाणपत्र(Certificate) आदी प्रमाणपत्र काढावयाची असतील तर तहसील कार्यालय येथे चकरा माराव्या लागतात, यासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास होऊ नये व विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी पुसद दिग्रस उपविभागातील दिग्रस तालुक्यातील ५० व पुसद तालुक्यातील ७० अशा एकूण १२० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये येत्या ६ जून रोजी महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, सेतू केंद्र संचालक आदी विशेष शिबिर घेणार आहेत. या शिबिरामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्येच एकाच वेळी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र मिळणार आहे, या विशेष शिबिरामुळे विद्यार्थी व पालकांच्या वेळेची, पैशांची व श्रमाची बचत होणार असल्याने आयोजित शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरामुळे ऐन निकाल आणि प्रवेशाच्या काळात विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
६ जून रोजी प्रत्येक माध्यमिक शाळेत शिबिर
दिग्रस व पुसद तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च शाळांच्या मुख्याध्यापकांच्या यापूर्वीच सभा घेऊन आपापल्या शाळेतील प्रवेशित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सुचित करण्याबाबत सांगितले आहे. येत्या 6 जून रोजी माध्यमिक शाळेत महसूल विभागाचे शैक्षणिक प्रमाणपत्राचे वितरण करतील. विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळली जाऊन त्यांना दलालापासून संरक्षण मिळणार आहे. आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसद.