हिंगोली (Students Suicide Case) : येथील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातील वसतीगृहात १८ जानेवारीला एका १७ वर्षीय विद्यार्थींनीने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु काही जणांच्या सर्तकतेमुळे तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना २८ जानेवारीला तिचा मृत्यू झाला.
हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील पोर्णिमा विलास कांबळे (१७) ही विद्यार्थींनी (Students Suicide Case) हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागांतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातील वसतीगृहात राहत होती. पोर्णिमा ही एका महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. १८ जानेवारीला दुपारच्या सुमारास तिच्या खोलीमधील मैत्रींनी ह्या काही वस्तु आणण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान पौर्णिमाने खोलीमध्ये ओढणीने गळफास घेतला होता.
वसतीगृहातील विद्यार्थींनीच्या (Students Suicide Case) निदर्शनास ही बाब येताच त्यांनी खिडकीची काच फोडुन तिला खाली काढुन तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार केला जात होता. मागील १० दिवसांपासुन व्हेटीलेटरवर उपचार सुरू असताना २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे वसतीगृहात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
घटने प्रकरणी चौकशीचे आदेश
पौर्णिमा कांबळे हिने वसतीगृहात १८ जानेवारीला गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारा दरम्यान नांदेड रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना २८ जानेवारीला तिचा मृत्यू झाला. या (Students Suicide Case) घटने प्रकरणी समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देवशटवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.