टायगर फोर्सच्या शिष्टमंडळाशी केली चर्चा!
पांढरकवडा (Sub-Divisional Officers) : शहरात सर्वत्र डेंग्यु, मलेरीया, टायफाईडचे रुग्ण वाढत चालले आहे. रस्त्याची व नाल्यांची साफसफाई योग्यरित्या करण्यात येत नसल्याने व चौकाचौकात कचर्यांचे ढिगारे (Garbage Heaps) पडुन राहत असल्याने शहरात रोगराईचे प्रमाण वाढले आहे. न. प. च्या वतीने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मागिल आठवड्यात टायगर फोर्सच्या वतीने यावर तोडगा काढण्याकरीता उपविभागीय अधिकारी केळापुर (Sub-Divisional Officer Kelapur) यांना निवेदन (Statement) देण्यात आले होते. त्या निवेदनाची दखल घेत 5 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी अमितकुमार रंजन यांनी न. प. मुख्याधिकारी व टायगर फोर्सच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजीत केली होती. त्यामध्ये उपविभागीय अधिकार्यांनी मुख्याधिकार्यांना शहरातील अस्वच्छतेबाबत जाब विचारुन येत्या 8 दिवसात स्वच्छतेची (Cleanliness) संपुर्ण कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले.
उपाय योजनेची काम करण्यास दिरंघाई, नागरिक संतप्त!
न. प. च्या गलथन कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना (Citizens) बसत आहे. प्रभारी मुख्याधिकार्याचे आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यावर नियंत्रण नसल्याने स्वच्छ व सुंदर शहराची पुर्ती वाताहात होतांना दिसुन येत आहे. जागोजागी कचर्याचे ढिगारे, ओपन प्लेस व खुल्या प्लॉट मध्ये साचुन असलेले पावसाचे पाणी, त्यात होत असलेली डासांची उत्पत्ती, गांजर गवताचे वाढत असलेले प्रमाण, शहरातील नागरिकांच्या घरुन नियमित कचरा न नेणे, फॉगींग मशिनचा वापर न करणे आदि बाबीमुळे शहरात डेंग्यु, मलेरीया, टायफाईड सारखे गंभीर आजार पसरले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जिवित्वास धोका निर्माण होत असतांना न. प. च्या वतीने मात्र उपाय योजनेची काम करण्यास दिरंघाई करण्यात येत असल्याने नागरिक संतप्त होत आहे.
प्रश्न न सोडविल्यास टायगर फोर्सच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा!
आजच्या उपविभागीय अधिकार्यांच्या आढावा बैठकीमध्ये टायगर फोर्सच्या शिष्ट मंडळाने मुख्याधिकार्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली होती. या शिवाय उपविभागीय अधिकार्यांनी सुध्दा मुख्याधिकार्यांना या अस्वच्छतेच्या कळसाबाबत जाब विचारुन कानउघाडणी केली. येत्या आठ दिवसात शहरातील स्वच्छतेच्या कामाचा प्रश्न न सोडविल्यास टायगर फोर्सच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा ईशारा यावेळी मदन जिड्डेवार, अंकित नैताम, आनंद वैद्य, मनोज भोयर, संजय चन्नावार, संजय औदार्य, रामचंद्र अडते, सागर व्यास, शुभम वरगंटीवार, संतोष पवार, नितिन इंगोले आदिंनी दिला आहे.




