शेकडो शेतकऱ्यांना दिला शेतीतून समृध्दी चा मंत्र!
चांदूरबाजार (Yashogatha 2) : “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या उक्तीला परिश्रमाची जोड देत जोखीम पत्करत चांदूरबाजार तालुक्यातील रुपेश उल्हे व अभिजीत बंड या दोन युवा शेतकऱ्यांनी शेतीतून समृद्धी चा मार्ग तयार केला आहे.
कपाशी, तूर, सोयाबीन, चना या कोरड वाहू तसेच संत्रा बागायती या पिकावर गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांची पोरं शेतीपासून दूर जात आहे अशा या परिस्थितीत फक्त कोरडवाहूच पिकासाठी पोषक आहे असा समज असलेल्या शेतीतुन वडूरा येथील रुपेश उल्हे व खरवाडी येथील अभिजीत बंड या तरुण पोरांनी सहा वर्षांपूर्वी टरबूज लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू केला तेव्हापासून टरबूज आणि खरबूज पिकात कुशल होण्याच्या दृष्टीने त्यांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासह विविध वाणांचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी सुरू केला.
केवळ पीक लागवड करून विक्री झाली म्हणजे सगळे झाले असे होत नाही बाजारपेठ म्हटलं की तेजी, मंदी आलीच माला बरोबर आपले नावही जोडलेले असते, व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी तुमच्या मालाचा दर्जा उत्तम हवा, सातत्य असल्याने मंदीतही पैसे होतात हे त्यांच्या लक्षात आले म्हणून .या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन यामध्ये सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांचा संतुलित अवलंब पिकांच्या उत्पादकतेसाठी माती, पाणी, बियाणे व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्वदिले, लागवडीवर जास्त भर देत,नासिक च्या रोपवाटिकेतून निरोगी रोपे तयार करून घेतली आणि.. हाच त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला असे म्हणता येईल कपाशी, सोयाबीन, तूर हे पारंपरिक पीक घेतल्या नंतर उण्यापुऱ्या तीन महिन्यांत एकरी लाखोंचे उत्पन्न हे पीक देत गेले.
मग फक्त या पिकावर न थांबता व वर्षभर टरबूज, खरबूज, टोमॅटो, झेंडू, सोबतच भाजीपाला वर्गीय पिकातून समृद्धीकडे वाटचाल या तरुणांची सुरू झाली. बघता बघता तालुक्यातील शेकडो तरुण शेतकऱ्यांनी या युवा जोडगोळी ची वाट चोखळली आहे. सद्यस्थितीत लागवडी पासून ते विक्री पर्यन्त चे मार्गदर्शन रुपेश उल्हे शेताच्या बांधावर जाऊन करतो म्हणून गतवर्षी खरवाडी येथील एक हात नसलेल्या दिव्यांग अमोल भाजीपाले या तरुण मुलाने एक एकरातून तबबल 35 टन टरबूज घेऊन साडे तीन लाखाचे उत्पादन घेतले. आज याचा परिपाक म्हणून फक्त आणि फक्त कोरडवाहू पट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या या भागात आता बागायती शेती करून समृद्धी ची कास युवा शेतकऱ्यांनी धरली आहे.
कृषी अधीक्षक कडून शाबासकीची थाप!
अलीकडील काळात हवामान बदलामुळे सर्वच भाजीपाला उत्पादकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या अडचणी येत असतात अनेकदा बियाण्यांची उगवण एकसारखी होत नाही. दुबार टोकनही करावी लागते यामुळे पिकाचा कालावधी कमी जास्त होतो. एकंदरीत। शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संत वचनामध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व सांगितले गेले आहे बाब हेरून या पठ्ठ्यानी अत्याधुनिक रोपवाटिका उभारण्याचा आणखी एक धाडसी स्वप्न दोन वर्षांपूर्वी बघितले व आज ते प्रत्यक्षात उतरविले. चांदुर बाजार तालुक्यातील एकमेव रोपवाटिकेचे उद्घाटन नुकतेचजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले. या युवकांची शेतीप्रति असलेली प्रतिबद्धता बघून त्यांनी शाबासकीची थाप व मोलाचा सल्ला पण या युवकांना दिला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे श्री रविंद वाघमारे,उमेश फुलारी राहुल सिंग विषवजीत चव्हाण सुधीर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.