नागपूर(Nagpur):- महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल(Lata Mangeshkar Hospital), हिंगणा रोड, नागपूर येथे अलीकडेच, मोठ्या पेटंट डक्टस आर्टेरिओसस (पीडीए) चे निदान झालेल्या एका वर्षाच्या मुलाचे पीडीए म्हणजेच मोठ्या धमण्यांमधील छिद्र यशस्वीरित्या बंद करण्यात आले. ही प्रक्रिया हृदयरोगतज्ज्ञ(Cardiologist) डॉ. मनीष चोखांद्रे, डॉ. हितेश भागवतकर आणि डॉ. गिरीश नानोटी (बालरोग विभागप्रमुख) यांच्या मेडिसिन आणि कॅथलॅब विभागाच्या तज्ज्ञ पथकाने केली.
लता मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश
योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. ही जटील प्रक्रिया केल्यावर बाळाला दुसऱ्याच दिवशी सुट्टी देण्यात आली. पीडीए हा जन्मापासून हृदयविकार(Heart disease) आहे. ज्यामध्ये हृदयापासून निघणाऱ्या दोन मोठ्या धमण्यांचा समावेश होतो. उपचार न केल्यास हृदय निकामी होते. पूर्वी ओपन हार्ट सर्जरी(Heart surgery) हा एकमेव पर्याय होता. परंतु, आधुनिक उपचार तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने करून बाळाचे प्राण वाचविण्यात आले.
शस्त्रक्रियेविना बाळाचे प्राण वाचविले
लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर हे गेल्या ३५ वर्षांपासून मध्य भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातीलगरजू लोकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅबच्या उपलब्धतेसह, बालरोग इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट प्रक्रिया तज्ञ बाल हृदयरोग तज्ञांद्वारे नियमितपणे केल्या जातात. तसेच, बालरोग विभागामध्ये सुसज्ज नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग, बालरोग शस्त्रक्रिया सेवा आहेत. हे रुग्णालय नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी (बालपण एपिलेप्सी) आणि न्यूरोडेव्हलपमेंट, चाइल्डहुड अस्थमा आणि उच्च जोखीम असलेल्या नवजात क्लिनिक सारख्या बालरोगविषयक उप-विशेषता सेवा देखील प्रदान करते.