भिवापूर (Nai Kiran Abhiyan) : जिल्हा परिषद नागपूर (Zilla Parishad) आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नई किरण” हा ग्रामीण भागातील महिलासाठी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी उपक्रम राबविला जात आहे. ह्या माध्यमातून तालुक्यातील 47 महिला दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. अश्या सर्व महिलांचा पंचायत समिती भिवापूर (Panchayat Samiti Bhiwapur) येथे सत्कार करण्यात आला.
दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश, यशस्वीतांचा सत्कार
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे ह्या (Nai Kiran Abhiyan) उपक्रमात विशेष मार्गदर्शन लाभले आहे. चंदाताई दामोदर सोनटक्के ह्या ७६% गुण मिळवून जिल्हय़ात दुसर्या तर तालुक्यात प्रथम क्रमांकावर पास झाल्या आहेत. एका पतीने आपली पत्नी परीक्षा देत नाही म्हणून स्वतः देखील परीक्षा देवून दोघेही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एक माजी महिला सरपंचसह आशा, अंगणवाडी मदतनीस, शाळा स्वयंपाकी, बचत गट महिला ह्यानी आपले काम कुटुंब सांभाळून जिद्दीने अभ्यास करून यश मिळविले आहे. ह्या प्रसंगी पंचायत समिती गट विकास अधिकारी डॉ चेतन जाधव , सहायक गट विकास अधिकारी विजय जिडगीलवार, केंद्र प्रमुख दिलीप शहारे, प्रथम फाऊंडेशन तालुका समन्वयक प्रगती शिंदे , उमेद तालुका व्यवस्थापक शेंडे व यशस्वी महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात प्रगती शिंदे यांनी अभियान राबविण्यात सुरवातीला आलेल्या येणार्या अडचणी आणि त्यानंतर भेटलेला चांगला प्रतिसाद याबाबत माहिती दिली. महिला असल्यामुळे माहेरी शिक्षण पूर्ण केले नाही. त्यामूळे लग्न झाल्यावर शिक्षणाची काही आशा राहिली नसताना, (Nai Kiran Abhiyan) नई किरणने दिलेली संधी हा दुर्मिळ योग होता. ह्या वयात म्हणजे मुलामुलींचे उच्च शिक्षण, लग्न करण्याच्या वयात आता शिकून काय फायदा अशी प्रतिक्रिया होती. काही कुटुंबमधून चेष्टा झाली तर, काही कुटुंबामधून पाठींबा मिळाला ,असे अनुभव कथन यशस्वी महिलांनी केले. प्रथम श्रेणीत पास होणार्या महिलांची संख्याबाबत उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. यशस्वी सर्व महिलांचे पुष्प व अभिनंदनपत्र देवून सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वसंत भोळे व आभार प्रदर्शन श्री दिलीप शहारे यांनी केले.