अतिक्रमणाच्या नावावर होणारे बांधकाम पाहून तहसीलदारही झाल्या अचंबित
वसमत (Wasmat Encroachment) : वसमत शहरातील अतिक्रमण पाहण्यासाठी सोमवारी तहसीलदारांनी शहरात बाजारपेठेत फेरफटका मारला रहदारीची कोंडी व झालेले मोठे मोठे अतिक्रमण पाहून तहसीलदार ही अचंबित झाल्या स्वा.गंगाप्रसादजी अग्रवाल शॉपिंग सेंटर जवळ न्यायालय कडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच वेळी भले मोठे अतिक्रमणाचे बांधकाम सुरू होते शॉपिंग सेंटर सारखे भर रस्त्यावर होणारेबांधकाम पाहून तहसीलदारही अचंभित झाल्या हे अतिक्रमण आहे की की शॉपिंग सेंटर असे उद्गार त्यांनी काढले तात्काळ हे हटवा अशा सूचना त्यांनी दिल्या.
वसमत शहरात वाढणाऱ्या वाढलेल्या (Wasmat Encroachment) अतिक्रमसंदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर तहसीलदार शारदा दळवी यांनी सोमवारी शहरातील बाजारपेठेत खरे फटका मारला यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांच्यासह नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी होते.
वसमत पोलीस ठाणे येथे कारंजा चौक या रस्त्याची त्यांनी पाहणी केली भाजी मंडी येथील अवस्था बाजारपेठेतील (Wasmat Encroachment) अतिक्रमण पाहून त्यांनी रहदारी सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर अडथळे करणारे अतिक्रमन हटवण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर उघड्यावर होणारी मास विक्री मटन विक्रीचे दुकाने त्यांनी पाहिले फुटपाथवर दुकानाचे अतिक्रमण पाहून त्यांनी हे सर्व प्रकार बंद करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. नरहर कुरुंदकर सभागृहाची दुरावस्था त्यांनी पाहिली तेथे मटक्याचे अड्डे चालवण्यासाठी अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा प्रकारही सर्वांनी पाहिला तात्काळ याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार शारदा दळवी यांनी दिले आहेत.
वसमत शहरात अतिक्रमण (Wasmat Encroachment) हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत भोंगे फिरत आहेत असे असतानाही भर दिवसा सुंदरलाल सावजी बँके समोर रस्त्यावर लोखंडी शेड उभे करून शटर चे दोन ते तीन दुकाने उभे करण्याचे काम सुरू होते त्याचवेळी तहसीलदार व अधिकारी तेथे पोहोचले हा प्रकार पाहून सर्वजण अचंबित झाले हे अतिक्रमण आहे का स्वतःच्या प्लॉटवर शॉपिंग सेंटर चे बांधकाम सुरू आहे असा प्रश्न सर्वांना पडला भर रस्त्यावर सुरू असलेले हे अतिक्रमण तात्काळकाढून टाकण्याचा सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या नरहर कुरुंदकर सभागृहात सुरू असलेल्या मटक्याच्या बुक्क्यासाठीचे बांधकाम टपऱ्याही नागरिकांनी तहसीलदारांना दाखवल्या.