निलंगा(Latur) :- 17 महिने झाले तरीही लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ऊस (sugar cane) कारखाने नेत नव्हते. 14 वर्षे बंद पडलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना आम्ही चालू केला आणि शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा अधिक म्हणजे 2765 रुपये प्रति टन भाव दिला, असा दावा करतानाच साखर कारखानदारीत गेली अनेक वर्षे असलेली मक्तेदारी मोडीत काढत आम्ही शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविली, असे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्याला बोगस म्हणणाऱ्यांचा समाचार घेतानाच लातूरला रेल्वे बोगी प्रकल्पात साडेपाचशे युवकांना नोकरी मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
शेतकऱ्यांची होणारी लूट आम्ही थांबविली
शुक्रवारी (दि.27) युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे जनसन्मान संवाद यात्रेत बसपूर, बुजरूगवाडी, हणमंतवाडी (मु) येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना निलंगा विधानसभा मतदारसंघात जात धर्म पक्ष न पाहता प्रभावीपणे राबवत आहेत. कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. कानावर विश्वास ठेवू नका, आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष विकास पहा व आपल्यासाठी आपल्या भविष्यातील मुला बाळासाठी कोण विकास करतो हे पहा व मतदान करा, असे शेवटी निलंगेकर म्हणाले.
यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष, शेषेराव ममाळे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंडेराव जाधव,रामभाऊ काळगे, गणेश क्षीरसागर,सखाराम काळे, सुधाकर बिरादार, दत्तू आजणे, किशन नरवटे, जोतिराम कुमठे, धर्मराज क्षीरसागर, सिध्देश्वर बिरादार, भाजपा तालुकाध्यक्ष, कुमोद लोभे, दत्ता मोहळकर ,विनायक गोमसाळे उपस्थित होते.