मूल(Chandrapur):- बाजारात हॉटेल लावुन कुटुंबियांसह आपली उपजिवीका करणार्या युवकाचे मागील दोन दिवसांपासुन आर्थीक नुकसान (Financial loss)होत असल्याने निराश झालेल्या अंकित विलास खोब्रागडे (२७) रा. मूल याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजता दरम्यान उघडकीस आली.
त्याची राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या
मूल येथील रामलीला भवनाचे मागील बाजुला राहणार्या अंकित विलास खोब्रागडे हा बाजारात हॉटेल लावत होता. दोन दिवसापासुन हॉटेलच्या व्यवसायासंबधी साहित्य तयार करुन ठेवले होते. परंतु त्यांला हॉटेल सुरू करता आले नाही, यामुळे बनविलेले साहित्य फेकुन द्यावे लागले. दरम्यान निराश झालेल्या अंकितने आकापूर स्थित असलेल्या एम.आय.डी. सी. (MIDC) मधील एका कंपनीमध्ये जावुन रोजगार सुध्दा बघितल्याची चर्चा आहे. मात्र अचानक त्याने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. काही वर्षापुर्वी अंकितचे वडील विलास खोब्रागडे यानी गळफास घेवुनच आत्महत्या केले होते. सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन (suicide) ला दिली असता मूल पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी, आई आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.