नांदेड जिल्ह्यात मिळाला मृतदेह
आखाडा बाळापूर/हिंगोली (Maratha reservation) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरगावपूल येथील युवकाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कयाधू नदीच्या पात्रात उडी मारली होती सदर तरूणाचा चार दिवसापासून शोध घेण्यात येत होता नांदेड जिल्ह्यातील पिंपरखेड ता. हदगाव शिवारात शनिवारी उशिरा मिळून आले असल्याचे डोंगरगावपूल उपसरपंच गजानन देशमुख व स्वप्निल देशमुख यांनी सांगितले. याप्रकरणी सुरेश पतंगे (देशमुख) यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डोंगरगावपूल येथील संदीप रामचंद्र पतंगे (देशमुख) (५१)े यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पूलावरुन कयाधू नदीच्या पात्रात उडी मारली होती. त्यांचा शोध ग्रामस्थ, नातेवाईक व पट्टीचे पोहणारे यांच्याकडून घेण्यात येत होता. शनिवारी उशिरा पिंपरखेड ता.हदगाव जिल्हा नांदेड शिवारात नदीपात्रात त्यांचा मृतदेह मिळून आला.शनिवारी रात्री डोंगरगाव पूल शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे डोंगरगावपूल येथे कयाधू नदीच्या पात्रात जलसमाधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन होते त्याच दिवशी थोडे माणस कमी झाले की त्यांनी थोडे पुढे जाऊन नदीत उडी मारली होती असे उपसरपंच गजानन देशमुख यांनी सांगितले.
आरक्षणासाठी अनेकांनी दिले बलीदान
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगावपूल बरोबर शेवाळा, देवजना, कान्हेगाव,येहळेगाव तुकाराम, सिंदगी, डिग्रस, वारंगा व इतर भागातील ११ सकल (Maratha reservation) मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आपले बलीदान दिले आहे. शासनाने लवकरात लवकर आरक्षण तिढा सोडवण्यासाठी पावले उचलण्याची सातत्याने सकल मराठा समाजाकडून मागणी होत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे असे मराठा स्वंयसेवक बाजीराव संवडकर, तुषार बोंढारे यांनी सांगितले