खऱ्या गुन्हेगाराला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न?
उदगीर (Suicide Case) : उदगीर येथील डॉ. नामदेव गिरी यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास यंत्रणेने (Investigative Mechanism) केलेला तपास अपूर्ण असल्याचे दिसून येते आणि खऱ्या गुन्हेगाराला (Criminal) निर्दोष सोडण्याचा प्रयत्न चालू असल्याचे गंभीर निरीक्षण उदगीर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी भालचंद्र झेंडे (Judicial Magistrate Bhalchandra Zhende) यांनी नोंदवले आहे. या प्रकरणात दोन महिन्याच्या आत चौकशी (Inquiry) करून पोलिसांनी पुरवणी अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
कोर्टाचे गंभीर निरीक्षण!
याबाबतीत थोडक्यात माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील खेर्डा येथे डॉ. नामदेव गिरी यांनी 25 मे 2022 रोजी विषारी औषध पिले होते. त्यानंतर त्यांना येथील उदयगिरी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर 25 मे ते 27 मे 2022 पर्यंत उपचार केल्यानंतर, प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथील कवठाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा 31 मे 2022 रोजी मृत्यू झाला. डॉक्टर गिरी यांनी विषारी औषध पिऊन बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल असताना 26 मे 2022 रोजी मयताच्या मुलाने वाढवणा पोलिसांना डॉ. गिरी यांनी लिहिलेली चिठ्ठी दिली. त्यावर त्याच दिवसाची म्हणजेच 26 मे 2022 तारीख आहे. त्या चिट्ठीआधारे वाढवणा पोलिसांनी (Increasing Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सर्व प्रमुख व्यक्तीचे सीडीआर पोलिसांनी का दाखल केले नाहीत?
बेशुद्ध अवस्थेत असलेला रुग्ण उपचार चालू असताना दुसऱ्या दिवशीची तारीख असलेली चिठ्ठी पोलिसांच्या नावाने कसा लिहू शकतो? अशी भूमिका घेत या गुन्ह्यातील आरोपीने उदगीर न्यायालयात (Udgir Court) अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने उदगीर येथील जेएमएफसी न्याय दंडाधिकारी भालचंद्र झेंडे यांनी 22 मे 2025 रोजी त्यांचा अर्ज स्वीकारत तपासामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवले. डॉ. गिरी यांच्या सुसाईड नोटची हस्ताक्षर तज्ञांकडून तीन वर्षांपासून तपासणी का केली नाही? पोलिसांनी दाखल केलेले दोषारोप पत्रासोबत कोर्टात सुसाईड नोट का सादर केली नाही? दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर 1 वर्षानंतर सुसाईड नोट पडताळणी न करता कोर्टात सादर करण्यात आली. तसेच या प्रकरणातील मृत पावलेल्या डॉक्टर नामदेव गिरी व त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व प्रमुख व्यक्तीचे सीडीआर पोलिसांनी का दाखल केले नाहीत? या व इतर गंभीर त्रुटी तपासामध्ये दिसून आल्याने कोर्टाने 22 मे 2025 रोजी लातूर पोलीस अधीक्षक (Latur Superintendent Police) यांना निर्देश देऊन या प्रकरणाची दुसऱ्या अधिकाऱ्याकडून तपासणी करावी, डॉ. गिरी यांच्या सुसाईड नोटची चौकशी करावी, मृत डॉ. नामदेव गिरी यांची वैद्यकीय पदवी तपासावी, उदयगिरी हॉस्पीटल व कवठाळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारांच्या कागदपत्राची चौकशी करून सर्व पुरवणी अहवाल दोन महिन्याच्या आत कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.