रिसोड (Risod) :- रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथून जवळच असलेल्या लोणी खुर्द तालुका रिसोड येथील अल्पभुधारक शेतकरी (Farmer)तेजराव आत्माराम गाडे अंदाजित वय 53 वर्षे यांनी दिनाक 11 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या गावा शेजारील गट नं 18 च्या शेतात नायलॉन दोरीने अंदाजित सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान गळफास लावुन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली.
गावा शेजारील शेतात नायलॉन दोरीने गळफास लावुन आत्महत्या
लोणी खुर्द येथील शेतकरी तेजराव आत्माराम गाडे यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती लोणी खुर्द चे पोलीस पाटील संजीव गाडे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली असता रिसोड पोलीस स्टेशनचे (Police station)ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोकराव गीते यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस तपासाची सुत्रे हलवली सदर शेतकऱ्यांकडे बँकेचे पिक कर्ज असुन सततची नापीकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळुन आपली जीवनयात्रा संपवली तसेच त्यांना दुर्धर असा पोटाचा त्रास असल्याने आपल्या बिमारीचा खर्च कसा भागवावा असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी गळफास घेतआपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्यामागे त्यांची पत्नी,एक अविवाहित मुलगा,व एक मुलगी,व इतर नातेवाईक असा मोठा आप्त परीवार आहे.पोलीस उप निरीक्षक अशोकराव गीते पुढील तपास करत आहे.