चिखली (Buldhana):- ४५ वर्षीय एसटी बस चालकाने राहत्या घरामध्ये नायलॉन दोरीच्या(Nylon rope) साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे(Suicide) कारण अद्यापही कळाले नाही. ही घटना १२ जुलै रोजी सायंकाळी मेरा खुर्द येथे घडली .
नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवाशी असलेले रामकृष्ण पाटीलबा शिंदे यांचे जावई राजेंद्र साहेबराव शिंगणे रा.दे मही हे गेल्या १५ ते २० वर्षा पासून मेरा खुर्द येथे कायमस्वरूपी राहत असे त्यांच्याकडे दे मही शिवारात २ एकर कोरडवाहू शेती आहे. शिंदे यांचे जावई राजेंद्र व मुलगी हे पती पत्नी अतिशय गरीब स्वभावाचे असल्याने त्यांचे साले गजानन शिंदे यांनी त्यांना एसटी बस (ST Bus)मध्ये चालक पदावर नोकरीला लावले होते. नोकरी लागल्यापासून त्यांचा संसार आनदांत सुरू होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा एसटी महामंडळ मध्ये नौकरी करीत घरून ये जा करीत होते. दररोज घरी आल्यानंतर ते नेहमी नैराश्य मध्ये राहत असत त्यातच गेल्या काही महिन्यापासून पगार झालेले नसल्याने त्यांना घरखर्च कसा करावा हा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. नेहमीच नैराश्य मध्ये राहत असल्याने घरच्यांनी अनेकवेळा त्यांना विचारले की तुम्ही नाराज का राहता पण ते घरी काहीही सांगत नव्हते. आणि १२ जुलै रोजी पत्नी शेतात गेली होती मुलगी सासरी होती. आणि मुलगा बाहेर गावी शिक्षण शिकत आहे.
नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली संपवली जीवनयात्रा
घरी कोणीही नाही पाहून राजेंद्र शिंगणे यांनी राहत्या घरामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती सरपंच रमेश अवचार, बाळू वराडे, दिपक शिंगणे , सदाभाऊ शिंदे , आनंद शिंदे यांनी लगेच अंढेरा पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार विकास पाटील, बिट जमादार कैलास उगले यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा केला. मात्र वृत्त लीहेपर्यत आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असल्याने पोलीस तपासात काय प्रकार आहे हे उघडकीस येईल. मात्र घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावकरी हळहळ व्यक्त केली जात आहे .