परभणी(Parbhani):- सोनपेठ तालुक्यातील मौजे कोठाळा येथील एका तरुण शेतकऱ्यांनी शेतीत आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली असून या मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे दि २२ रोजी रात्री घ्या सुमारास शिवारातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकरी पांडुरंग केशव गरड वय ३८ वर्षे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतीत (Farm) आलेल्या नैराश्यातून व थकलेल्या पिक कर्जाला कंटाळून पांडुरंग याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले . पांडुरंग यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी व आई असुन त्पाला पाच एकर शेती असून त्याच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Grameen Bank)व सोसायटी चे कर्ज होते