गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद!
परभणी (Suicide) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पायाला झालेल्या दुखापतीच्या (Injury) त्रासाला कंटाळून 55 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना 11 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील गौतमनगर परिसरात घडली होती. रुग्णालयात उपचार (Hospital Treatment) सुरु असतांना या इसमाचा शुक्रवार 13 जून रोजी मृत्यु झाल्यामुळे गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून उजवा पाय सुजून दुखापत झाल्यामुळे व त्याचा त्रास सहन होत नसल्यामुळे शहरातील गौतमनगर परिसरातील दत्ता अर्जुन पवार वय 55 वर्षे यांनी बुधवार 11 जून रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या घरातील रुममध्ये पत्राखाली लावलेल्या आडव्या आडुला दोरीने गळफास घेतला. याची माहिती समजताच त्यांच्या मुलाने व अन्य नातेवाईकांनी (Relatives) गळफास काढून त्यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोउचार करून परभणी येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) हलविले असता शुक्रवार 13 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाल्याची खबर मयताचा भाऊ रंजीत अर्जुन पवार वय 45 वर्षे रा. अंधोरी ता. अहमदपूर यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास जमादार सुरेश राऊत, पो. शि. राम पडघन करीत आहे.




