अमरावती (Sulabha Khadke) : मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांची गत पाच ते सहा वर्षापासून रखडलेली जुनी देयके तात्काळ निघणार आहे. वेतन पथक(माध्यमिक) विभाग यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न करणार असून यासाठी त्यांना मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आला आहे. आज मंगळवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत आमदार सुलभा खाेडके (Sulabha Khadke) यांनी संबंधितांना निर्देश दिल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. (State Teachers Union) राज्य शिक्षक संघाने हा मुद्दा लावून धरला हाेता. यामुळे राज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश मिळाले आहे.
राज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश
वेतन पथक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी यासाठी राज्य शिक्षक संघाने यापूर्वी शिक्षण उपसंचालक व वेतन पथक (माध्यमिक) यांना निवेदन दिले हाेते. यानंतर आज डाएट येथे यासंदर्भात आमदार सुलभाताई खाेडके (Sulabha Khadke) यांच्या अध्यक्षतेत महत्वाची सभा पार पडली. सभेला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, अधिक्षक श्रीमती सुनीता साबळे, अधिक्षक वेतन पथक सचिन गुल्हाने, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू, सरचिटणीस भाेजराज काळे आदी उपस्थित हाेते. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांची जुनी देयके वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयात रखडली आहेत. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून ही पथके निकाली काढण्यात यावी अशी मागणी करण्यात येत हाेती. (State Teachers Union) राज्य शिक्षक संघाने यापूर्वी याबाबत शिक्षण उपसंचालक व वेतन पथक कार्यालयाकडे याबाबत पाठपुरावा केल्याचे राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू यांनी यावेळी बाेलतांना सांगितले.
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलासा
जुनी देयके रखडल्यामुळे संबंधितांना त्रास हाेत आहे. त्यामुळे ही बाब निकाली काढावी असे दिलीप कडू यांनी सांगितले. यावेळी आमदार सुलभा खाेडके (Sulabha Khadke) यांनी वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाने यात तातडीने कार्यवाही करण्यास सूचित केले. कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने सहा कर्मचारी तातडीने त्यांना देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना वेतन पथक कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार सुलभा खाेडके यांनी मनुष्यबळाची कमतरता संपुष्टात आली आहे. त्यामुळे तातडीने जुनी देयके निकाली काढावी अशा सूचना दिल्या.
यावेळी आमदार सुलभा खाेडके (Sulabha Khadke) यांचे अध्यक्षतेखाली, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, अधिक्षक वेतन पथक सचिन गुल्हाने, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षक सुनिता साबळे, अश्विन मानकर, साधू साहु, दिपक पांडव, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू, सरचिटणीस भाेजराज काळे, अविनाश कडू,विजुक्टाचे अरविंद मंगळे, ललित चाैधरी, राजाभाऊ हूतके, नंदकिशाेर नवरे, नितीन ठाकरे, विशाल भाेयर,राजीक पठाण, डहाके सर, रविंद्र भटकर, रामेश्वर चरपे, गजानन मानकर, श्रीकांत कडू, दिपक कुलट, राजेश जाधव, प्रिया कडू, अलका मेश्राम, भारती ठाकूर यांचेसह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते. सभेचे संचालन व विषय वाचन श्रीकांत लाजुरकर, आभार मंजु अडवाणी यांनी केले.
या मुद्यांवर झाली चर्चा
वेतन पथक कार्यालयातील प्रकरणांसाठी बाेलाविण्यात आलेल्या सभेत भविष्य निर्वाह निधी चिठ्ठ्या वाटप, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव (अंतिम देयके), याबाबतचा परतावा, ना परतावा रक्कम, थकीत वेतन देयके (माध्यमिक व उच्च माध्यमिक 20टक्के, 40 टक्के व 60 टक्के वेतन देयके) रजा राेखीकरण देयके प्रकरण प्रस्ताव (सेवानिवृत्त कर्मचारी), एनपीएस पावती प्रकरण, सातव्या वेतन आयाेगानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचातिसरा, चाैथा हफ्ता थकीत बाबत, निवड व वरिष्ठ श्रेणी \रकाचे थकीत देयकेबाबत, महागाई भत्ता \रक, वैद्यकीय देयके व इतर थकीत देयके आदींवर चर्चा करण्यात आली.
शासन पातळीवरील प्रश्न साेडवू : आ. खाेडके
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे शासन पातळीवर असणारे सर्व प्रश्न साेडविण्याची ग्वाही सभेदरम्यान आमदार सुलभा खाेडके (Sulabha Khadke) यांनी दिली. संबंधितांनी यासाठी आपणास निवेदन दिल्यास त्याकरिता प्रयत्न करण्यात येणार आहे. शासन पातळीवर प्रश्न साेडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे आमदार सुलभा खाेडके यांनी सांगितले.