कोरची (Gadchiroli) :- मागील काही दिवसापासुन हवामानाच्या (weather) बदलामुळे धान पिकांवर रोगराईचे सावट पसरले आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी विविध कंपनीची महागडी कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतपीक लागवटीचा खर्च अधिक त्यातुलनेत उत्पन्न कमी अधिकचा भार, शेतकऱ्यांच्या मांगूटीवर कर्जाचा ओझे दरवर्षी बसत असताना मोठ्या आशेने शेती व्यवसाय करतो. मात्र त्यांच्या नशीब फक्त आणि फक्त निराशाच नशिबी येत असल्याचे दिसुन येत आहे.
हवामानाच्या बदलामुळे धान पिकांवर रोगराईचे सावट
कोरची तालुक्यात विविध भागात मोठयाप्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात मोठयाप्रमाणात बोअरवेल, विहीरी, आहेत. तसेच कोरची तालुक्यात मोठया धरणाच्या पाण्याची सुविधा नाही आहेत तरी मोठया प्रमानात धान लागवड करण्यात आली आहे. सध्या स्थितीत हिरवी गार धानपिके हवेची झोके घेत असतांना अचानकपणे वातावरणाच्या बदलामुळे धान पिकावर विविध रोगाचे आक्रमक केले आहे. यात करपा, खोड, किडा, अळी, आदी रोगांचा आक्रमक करून धान पीक करीत आहेत. त्यांच्या रोगाचा आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी विविध महागडी कीटक नाशक औषधी विकत घेऊन फवारणी करीत आहेत. मात्र ते रोग आटोक्यात येत नसल्याने फवारणी सुद्धा निकामी होत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी शेतकऱ्यावर अस्माने व सुलतानी असे संकटावर संकट येत असताना त्यातून सावरत नाही तोच मोठ्या आशेने पुढील हंगामाच्या कामाला लागतो. मात्र त्यांच्या नशिबी निराशा येत असते.
सध्या उन्हाळी धान पिकावर दुबार तिवार वेळ कीटकनाशक औषध(Pesticides) तिची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याचे पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खाईत ओढवला जाण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही .कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन धान पिकाची असलेले विविध रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची मार्गदर्शन करून सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.