अध्यक्षपदी सुनील फुंडे तर उपाध्यक्षपदी प्रदीप पडोळे यांची बिनविरोध निवड
भंडारा (District Central Bank) : सहकार क्षेत्रातील शेतकर्यांची बँक म्हणून ओळख असणार्या (District Central Bank) भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता दि. १३ ऑगस्ट रोजी बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलविण्यात आली. या सभेत सुनील फुंडे (Sunil Funde) यांची सलग तिसर्यांदा व उपाध्यक्षपदी इंजि. प्रदीप पडोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकार पॅनलचे १७ तर शेतकरी पॅनलचे ४ संचालक निर्वाचित झाले होते.
शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार्या (District Central Bank) भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दि. १८ जुलै २०२५ रोजी २१ संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी नेते खा. प्रफुल्लभाई पटेल, माजी राज्यमंत्री आ. डॉ.परिणय फुके व मित्र पक्षाकडून महायुती समर्थित सहकार पॅनल व आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनल आमोरसामोर उभ्या ठाकल्या होत्या. झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलला १७ जागा तर शेतकरी पॅनलला ४ जागांवर विजय प्राप्त झाला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (District Central Bank) सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता राजकीय नेत्यांसह पदाधिकारी व नागरिकांना लागली होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता सहकार पॅनलमध्ये हलचली वाढून मोर्चेबांधणी करण्यात आली.
दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरीता (District Central Bank) बँकेच्या सभागृहात दुपारी नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलविण्यात आली होती. या सभेत अध्यक्षपदासाठी सहकार पॅनलकडून सुनील बाबुराव फुंडे तर उपाध्यक्ष पदाकरीता प्रदीप मोतिराम पडोळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी अध्यक्षपदाच्या अर्जावर सूचक म्हणून प्रदीप हरिश्चंद्र बुराडे तर अनुमोदक म्हणून मोहित अशोक मोहरकर यांच्या स्वाक्षर्या होत्या. तर उपाध्यक्ष पदाकरीता सूचक म्हणून वैâलास भैय्यालाल नशिने तर अनुमोदक म्हणून नाना जयराम पंचबुध्दे यांच्या स्वाक्षर्या होत्या.
यावेळी अध्यक्षपदी सुनील फुंडे (Sunil Funde) तर उपाध्यक्षपदी प्रदीप पडोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेला नवनिर्वाचित संचालक होमराज कापगते, कैलास नशिने, धर्मराज भलावी, प्रशांत पवार, अनिल सार्वे, विश्वनाथ कारेमोरे, चंपालाल कटरे, धर्मेंद्र बोरकर, मोहित मोहरकर, प्रदीप बुराडे, प्रदीप पडोळे, श्रीकांत वैरागडे, संदीप फुंडे, कवलजितसिंह चढ्ढा, अजय मोहरकर, तिरा भाऊराव तुमसरे, आशा अनिल गायधने, योगेश हेडावू, नाना पंचबुध्दे, चेतक डोंगरे उपस्थित होते. निवडणुकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या बिनविरोध निवडीनंतर गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
