वाशिंग्टन (Sunita Williams) : सुनीता लिन विल्यम्स या भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकन नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांनी सर्वाधिक स्पेसवॉक करणारी महिला (7 वेळा) आणि सर्वाधिक वेळ (50 तास, 40 मिनिटे) स्पेसवॉक करणारी महिला, असे दोन विक्रम केले होते. पण आता ह्याच (Sunita Williams) सुनीता विल्यम्स नेमके आहेत कुठे? या प्रश्नाचे उत्तर नासा शोधात आहे. (NASA Spacecraft) नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिचा साथीदार बुच विल्मोरसोबत दोन महिन्यांहून अधिक काळ अंतराळात अडकली आहे.
बोईंग स्टारलाइनरच्या पहिल्या मानव मोहिमेच्या प्रक्षेपणाद्वारे त्या 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांना फक्त आठ दिवस इथे राहायचे होते. तथापि, कॅप्सूलमधील थ्रस्टर्सच्या खराबीमुळे, त्यांची परत येण्याची नेमकी वेळ आता ठरलेली नाही. त्यांच्या पृथ्वीवर परतण्याबाबत चिंता वाढत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबाबत मोठा धोका निर्माण होण्याची भीती आहे. रुडी रिडॉल्फी, (NASA Spacecraft) माजी यूएस मिलिटरी स्पेस सिस्टम कमांडर, यांनी तीन संभाव्य आपत्तीजनक परिस्थितींची रूपरेषा सांगितली आहे. ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. जेव्हा ती बिघडलेल्या बोईंग स्टारलाइनर स्पेसक्राफ्टद्वारे परत येण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा असे होऊ शकते.
पृथ्वीवरून बोईंग स्टारलाइनरचे प्रक्षेपण यशस्वी झाले. पण अंतराळात गेल्यावर हीलियम गळती आणि थ्रस्टर खराब होणे यासारख्या समस्या निदर्शनास आल्या. बोईंग स्टारलाइनर वापरून (Sunita Williams) सुनीता विल्यम्सच्या परतीच्या मोहिमेला पुढे जायचे, की स्पेसएक्स वापरून बचाव मोहीम सुरू करायची. यावर नासा सध्या विचार करत आहे. रिडॉल्फीने सांगितले की, स्टारलाइनरच्या सेवा मॉड्यूलने सुरक्षित परतीसाठी कॅप्सूल योग्य कोनात ठेवणे आवश्यक आहे. यात थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात.
रिडॉल्फीने चेतावणी दिली की. जर कॅप्सूल योग्यरित्या रेषेत नसेल तर, ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करताना जळू शकते, किंवा परत अवकाशात फेकले जाऊ शकते. त्यांनी परत येण्याबाबत तीन प्रकारचे धोके सांगितले आहेत. पहिला संभाव्य धोका असा आहे की, जर कॅप्सूलने चुकीच्या कोनात पुन्हा प्रवेश केला तर ते वातावरणातून बाहेर पडू शकते आणि परत अवकाशात जाऊ शकते. स्टारलाइनरमध्ये फक्त 96 तास ऑक्सिजन आणि अयशस्वी थ्रस्टर्स असतील. अंतराळवीर (Sunita Williams) सुनीता विल्यम्स नंतर अंतराळात अडकले असतील.
सुनीता यांच्या पतीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांनाच आश्चर्य
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) अंतराळात अडकेलली आहे. पण त्यांचे पती मायकल विल्यम्स यांना त्याची चिंता नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंतराळ ही सुनीताची आनंदाची जागा आहे. तिथे तिला अनिश्चित काळासाठी राहावे लागले तरी ती राहील, असे मायकल यांनी म्हटले आहे. अंतराळात राहिल्यावर तिला आनंद मिळतो. तिथे ती आपल्या जबाबदाऱ्यांचा आनंद घेत आहे, असेही मायकल यांनी सांगितले आहे.
विल्मोर यांच्या बायकोचं काय म्हणणं असेल?
सुनीता विलियम्स (Sunita Williams) यांचे सोबती विल्मोर हे आहेत. विल्मोर यांच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विल्मोर यांची पत्नी डियाना यांनी न्यूयॉर्क पोस्टला प्रतिक्रिया दिली होती. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्चपर्यंत ते दोघेही परत येतील, अशी आशा आम्हाला आहे, असे डियाना म्हणाली.
सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बॅरी विल्मोर याच्या पृथ्वी वापसीबद्दल सामान्य लोकांना कुतुहूल आहे. त्यांच्याजवळ पर्याप्त जेवण आणि ऑक्सिजन आहे का ? असा सवाल सामान्यांच्या मनात आहे. वास्तविक ते दोघे जण एक आठवड्यांच्या संशोधनासाठी तेथे गेले होते. नासा ऐवजी बोईंग स्टारलायनर यानाची चाचणी करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले होते. आता हा प्रकल्प यानातील बिघाडामुळे फसला आहे. (NASA Spacecraft) नासाने त्याबद्दल खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अनेक देशाचे अंतरराळवीर जाऊन संशोधन करून येत असतात. येथे पुरेसा अन्न साठा आणि ऑक्सिजन उपलब्ध असून अजून तरी काही इमर्जन्सीची स्थिती नसल्याचे नासाने म्हटले आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. (Sunita Williams) सुनीता विलियम्स आणि बॅरी विल्मोर हे यशस्वीरीत्या पुन्हा पृथ्वीवर पोहचावे हीच सर्वांची अपेक्षा आहे.