हिंगोली (Supply Department) : स्वस्तधान्य दुकानदारांनी केलेल्या अनेक आरोपानंतर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल यांच्याविषयी तक्रार करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. सदर प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकार्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसापासून (Supply Department) जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल यांच्या विरूद्ध स्वस्तधान्य दुकानदारांनी एल्गार पुकारून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे रितसर निवेदनाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची सत्यता आ.मुटकुळे यांनी पडताळणी केल्यानंतर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला पत्र देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी केली होती. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांनी या प्रकरणात तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतरही जिल्हा (Supply Department) पुरवठा अधिकार्यांच्या काही हितचिंतक राशन दुकानदारांनी त्यांची पाठराखण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. आ.मुटकुळेंनी आपला मुद्दा शासन दरबारी रेटून लावल्याने शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले. ज्यामध्ये आ.मुटकुळे यांच्या पत्रानुसार सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी उपस्थित केल्याच्या मुद्याच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यामुळे आता (Supply Department) जिल्हा पुरवठा अधिकार्याच्या कारभाराची चौकशी जिल्हा प्रशासना मधील वरिष्ठ अधिकार्याकडून होणार असल्याने जिल्हा पुरवठा अधिकार्यासह अन्य काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आतापासूनच कागदाची जुळवा जुळव व इतर काही अद्यावत माहिती परीपूर्ण करण्याकरीता पुरवठा विभागातील काही जण सक्रिय झाले असल्याचे बोलले जात आहे. चौकशी अंती यामध्ये कोणाकोणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
