नागपुर येथे सुरु असलेले महाएल्गार आंदोलनास पाठींबा दर्शविण्याकरीता जवळा-लोणी सर्कल व परिसरातील नागरीकांचा ट्रँक्टरने आर्णी तहसीलदाराना निवेदन
आर्णी (Mahaelgar Andolan) : बच्चु कडू व इतर शेतकरी संघटना यांचे नागपुर येथे सुरु असलेले महाएल्गार आंदोलनास पाठींबा दर्शविण्याकरीता जवळा-लोणी सर्कल व परिसरातील नागरीकांचा शेतकरी जाहिर पाठींबा दर्शविण्यासाठी आज गुरुवार ३० आँक्टोंबरला २ओ ट्रँक्टर घेवून आर्णी तहसिल कार्यालयात धडक देवून नागपुर येथे सुरु असलेले महाएल्गार आंदोलनास पाठींबा व उद्या शुक्रवार ३१ आँक्टोंबरला जवळा बंद करुन मोर्चा काढून महामार्गावर रास्तारोको करणार असल्याचे निवेदन तहसिलदार वैशाख वाहूरवाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पारडकर यांना दिले. 
जवळा-लोणी सर्कल व परिसरातील शेतकरी बांधवांनी शासनाच्या निषेधार्त शांतता व सुव्यवस्था राखून गावातून मोर्चा काढून जवळा बाजारपेठ बंद करण्याचे ठरविले असुन, व तसेच तो मोर्चा सरळ राष्ट्रीय महामार्गाने (Mahaelgar Andolan) जावून दारव्हा पॉईंट जवळ मर्यादीत वेळेपर्यंत बंद करण्याचे ठरविले असल्याचे निवेदन आर्णी तहसिलदार वैशाख वाहूरवाघ यांना देण्यात आले.
निवेदन देतावेळी संजय सूखदेवे, श्याम ढाकूलकर, सुमित वडपिल्लेवार, बबन चोपडे, रोहीदास आडे, सूहास पंचभाई, गजानन रिठे, योगेश तडसे, मयूर ढक, उमेश ढाकूलकर, चक्रधर उके, संतोष एकंडवार, ओम कोटमकार, निखिल राऊत, शूभम पिसे, नितेश धाये, शेख आरीफ, ज्ञानेश्वर चोपडे, गजानन आगलावे, अनिल देवगण, विशाल इंगोले, अतूल ठाकरे, संजय चव्हाण, भारत गायधने आदी शेतकरी बांधव अंदाजी विस ट्रँक्टर घेवून जवळा लोणी सर्कल व परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थीतीत होते.
