तर काहींनी केले तहसील समोर मुंडण
बाभूळगाव (Bachu Kadu Protest) : प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू ४ दिवसापासून शेतकऱ्यांच्या,शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी गुरुकुंज मोझरी येथे अन्यत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या या अन्यत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून बाभूळगाव तालुका प्रहार पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक, शेतकरी, दिव्यांग बांधव यांनी १२ जून रोजी सकाळी ११ वाजता बेंबळा धरणात उतरून आठ समर्थकांनी जलसमाधी आंदोलन केले. तर चार समर्थकांनी तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (Bachu Kadu Protest) यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाला सर्व स्तरावरून मोठा पाठींबा मिळत आहे. बाभूळगाव येथे आंदोलकांनी दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ६०००/- रू. सन्मान निधी मिळावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमिभावावर २० टक्के अनुदान मिळावे.पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे मनरेगाव्दारे घेन्यात यावे, मच्छीमार व मेंढपाळ यांच्याकरीता स्वतंत्र धोरण राबवुन त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे.मनरेगाची मजुरी ३१२/- रू. वरून ५००/- रू. करण्यात यावी.युवकांच्या हाताला काम नाहीतर सन्मानजनक दाम द्यावे.
तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात, इत्यादी मागण्या केल्या. पोलीस व धरणाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढले. यावेळी तालुक्यातील प्रहार पक्षाचे श्रीकांत घोंगडे,गणेश पुणे,विजय बनसोड,सचिन इंगोले,हरिदास भुराणे ,संदीप तीवाडे,समर घोंगडे,होनाजी रुईकर, खुशाल पिंपळकर, सुयोग आडे,अतुल हस्तापुरे, स्वप्नील वानखेडे,दीपक राठी,आशिष कांतोडे,निरंजन शेंडे,अक्षय लोहटे,ध्यानेश्वर डबले,मनोज राजुरकर,प्रमोद कातरकर, सारंग गुजर, गजानन वासे,सुधाकर दातार यांचेसह अनेक शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.