परभणी (Parbhani) :- स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या सुमारास राहत कॉलनी येथे केलेल्या कारवाईत (action) एका दुकानातून १४ आणि अॅटोतून ४ असे एकूण १८ पोते तांदुळ जप्त केला. सदरचा तांदुळ (rice) रेशनचा असल्याचा संशय आहे.
या प्रकरणी कोतवाली पोलीसात नोंद देण्यात आली आहे.
पोलीसांनी कारवाई करत १८ पोते तांदुळ जप्त केला
स्थागुशाचे सपोनि. राजु मुत्तेपोड, पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, शेख रफीक, निलेश परसोडे, इमरान यांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला राहत कॉलनी येथे एका शटरमध्ये रेशनचा तांदुळ असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी कारवाई करत १८ पोते तांदुळ जप्त केला. या ठिकाणी आढळलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याने आपले नाव इमरान खान असे सांगितले. तांदळाविषयी विचारणा केली असता उडवाउडविची उत्तरे दिली. पथकाने आठ क्विंटल वजनाचे १८ पोते तांदुळ जप्त केले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.