मंगरूळपीर/वाशिम (Medicine stock) : येथील खासगी वैद्यकीय व्यवसायिक डॉ. नवल असावा यांनी एका ठिकाणी साठवलेला १ लाख २५ हजार रुपयांचा विनापरवाना (Medicine stock) औषध साठा सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (Drug Administration) या कारवाईमुळे खासगी वैद्यकीय व्यवसायिकात खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागास (Drug Administration) मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळपीर येथील डॉ. असावा हे त्यांच्याकडे येणार्या रुग्णांना लिहून दिलेली औषधे एका मेडिकवरून खरेदी करण्यासाठी दबाव टाकतात. तसेच त्यांनी एका ठिकाणी विनापरवाना (Medicine stock) औषधीचा साठाही ठेवला आहे ,अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. त्यावरून अन्न व औषधी प्रशासन विभागाने (Drug Administration) औषधी निरीक्षक मनीष गोतमारे आणि त्यांच्या पथकाने सोमवार,१३ मे रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकत तपासणी केला. त्यावेळी तेथे १लाख २५ हजारांचा विनापरवाना औषधी साठा आढळून आला. तो औषधी साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने (Drug Administration) जप्त करून न्यायालयाच्या परवानगीने जप्त केला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.