रिसोड(Risod):- ६८ व्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धा, भोपाळ(Bhopal), मध्यप्रदेश येथे दिनांक ०५/०१/२०२५ रोजी पार पडल्या या स्पर्धेत भावना पब्लिक स्कूल,देगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे इयत्ता ९ वी शिकत असलेली विद्यार्थिनी कुमारी अर्शिती विजयकुमार सरनाईक हिने ४ थ्या फेरिअखेर ४१६.९० गुणांची कमाई करून १४ वर्ष वयोगटात सुवर्ण पदकाला गवसणी घालून शाळेच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.
या यशस्वी विद्यार्थीनीचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार तथा विधान परिषद सदस्य मा. भावनाताई पुंडलिक राव गवळी, संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य,क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले