स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयाला नॅककडून ३.३१ पॉईंटरसह ‘ए प्लस’ मानांकन
नागपूर (Dental college) : सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालय (Dental college) म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठद्वारा पुरस्कृत असलेले (Sw.Dadasaheb Kalmegh) स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रूग्णालयाला नुकताच राष्ट्रीय मुल्यांकन (NAAC ranking) आणि मान्यता परिषद बंगलोर (नॅक) ने ३.३१ पॉईंटरसह ‘अ+’ दर्जा बहाल केला आहे. उल्लेखनीय आहे की, राज्यातील एकल दंत महाविद्यालय वर्गवारीत हे मानांकन सर्वोत्कृष्ट ठरले आहे.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय (Dental college) व रुग्णालयाने आजवर शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर भर देऊन देशाला चांगले डेंटिस्ट आणि संशोधक दिले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प, फेलोशीप, पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकद्वारा सर्वेात्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतीक आणि मुल्यांवर आधारित गुणांचा विकास करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात. लक्षावधी रूपयांच्या शिष्यवृत्ती देखील (Dental college) महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना दरवर्षी दिल्या जातात. वैशिष्ट म्हणजे संशोधनाकरिता दरवर्षी एकूण ५ लक्ष ५५ हजारांचे ५ रोख पारितोषिक देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. त्यामुळेच महाविद्यालयाने अल्पावधीत देशभरात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.
नॅकद्वारा करण्यात आलेल्या मुल्यांकनासाठी डॉ. टी.पी.चर्तुर्वेदी यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. शुभांगी म्हस्के आणि डॉ. गिरीष एच.सी. यांच्या गठित समितीने आपला अहवाल नॅककडे सादर केल्यानंतर नॅकद्वारा (NAAC ranking) आज महाविद्यालयाला मानांकन जाहिर केले आहे. नॅकद्वारे मिळालेल्या ‘अ +’ मानांकनामुळे स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान आणि स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.
स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय (Dental college) व रुग्णालय यापुढे देखील अशाच पद्धतीने आपले कार्य अविरत सुरू ठेऊन चांगले विद्यार्थी घडविण्याचा यज्ञ सुरू ठेवेल अशी प्रतिक्रिया स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी दिली आहे. महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या या यशात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.