भुलीच्या ग्रामस्वच्छता महीलांनी केली अयोध्या येथे ग्रामसफाई
मानोरा (Swachata Hich Seva) : स्वच्छता हीच सेवा हा पंधरवाडा शासणाच्या आदेशाने पंधरवाडा आयोजीत केला. पंरतु तालुक्यातील भुली येथील ग्रामस्वच्छता महीला मंडळीनी थेट राज्याबाहेर जाऊन श्रीराम जल्मभुमित जाऊन ग्रामसफाई केली, त्यामुळे जि. प. वाशीम चा फलक राज्याबाहेर फडकला. भुलीच्या पोलीस पाटील छायाताई अरूण डहाके यांच्या नेतृत्वाखाली भुली च्या ग्रामस्वच्छता महीला मंडळानी अयोध्या येथे जाऊन हाती (Swachata Hich Seva) स्वच्छता हिच सेवा असा, जि. प. वाशीमचा फलक हाती घेऊन, अयोध्या सह शरयु नदीच्या तीरावर जाऊन ग्रामस्वच्छता केली. भुली च्या ५० ते ६० महीला या अभियानात सहभागी झाल्या होत्या.
भुलीच्या ग्रामस्वच्छता (Swachata Hich Seva) महीला मंडळीनी या आधी पंढरपुर , गुरुकुंज मोझरी, कौडण्यपुर, महाराष्ट्रभर ग्रामसफाई केली तालुक्यातील भुली येथे सुध्दा दर एकादशीला नियमीत ग्रामस्वच्छता करतात गावच्या पोलीस पाटील सौ छायाताई अरूण डहाके यांनी गावातील जेष्ठ महीला मंडळींना एकत्र करून हरीनाम सोबत ग्रामस्वच्छतेचा छंद जपला महाराष्टाबाहेर जाऊन ग्रामसफाई केली. संत गाडगे बाबा यांचा संदेश देश भर दिला. या वेळी स्वच्छतेचे जनक ह भ प खोडे महाराज यांच्या सोबत सह परिवार होते.