नाशिक (Nashik):- नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Electorate)महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे नाशिकची लढत राज्यात चांगलीच गाजली. परंतु आता शांतीगिरीजी महाराज वाराणसी येथे रवाना झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा ते भक्त परिवारासह प्रचार करणार आहे. महायुतीचे उमेदवार गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांच्या समोर स्वामी शांतीगिरीजी महाराज निवडणुक रिंगणात होते. नाशिकमध्ये कोण बाजी मारणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यातच आता शांतीगिरीजी महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी अपक्ष लढवली. शांतीगिरी महाराज मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत असेल तरी शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिक च्या निवडणुकी दरम्यान पंतप्रधान मोदींच्या कटआऊटला पुष्पहार अर्पण करून नाशिक वगळता रज्यभरतील जय बाबाजी भक्त परिवाराला महायुतीला मतदान करण्याचे संकेत दिले होते. महाराजांनी २००९ मध्ये संभाजी नगर (Sambhaji Nagar)येथे लोकसभा लढवत दीड लाखाहून अधिक मते घेतली होती. नाशिक, दिंडोरी, जालना , धुळे, संभाजी नगर, जळगाव या ठिकाणी निर्णायक असलेल्या जय बाबाजी परिवारचे मतदान महायुतीला (Grand Alliance) निश्चितच लाभदायक ठरणार आहे.
नाशिक मध्ये महाराजांना भाजपचा पाठिंबा ?
स्वामी शांतिगिरी महाराज यांची भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी निवडणूक अर्ज माघारीच्या अगोदर भेट घेतली होती. त्यात दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा देखील झाली होती. महाराज माघार घेतील अशी चर्चा देखील सुरू होती. परंतु महाराजांनी आता लढायचं आणि जिंकायचं असा निर्धार करत निवडणूक(Election) आखाड्यात शेवटपर्यंत राहिले. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची देखील महाराजांनी भेट घेतली होती. आता थेट पंत प्रधान मोदींचा प्रचार करणार असल्याने नाशिक मध्ये महाराजांना भाजपचा छुपा पाठिंबा तर नव्हता ना? असा सवाल मतदारांमध्ये केला जात आहे.
नरेंद्र मोदी राजकारणातील आदर्श…
वाराणसीत जय बाबाजी भक्त परिवार आहे, मोदी हे वाराणसीत साधू महंतांची भेट घेणार आहोत. मोदी राजकारणातील आदर्श असल्याने जय बाबाजी भक्त परिवार त्यांच्या प्रचारासाठी जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्या बाबत लोकसभा निकाला नंतर ठरवू.
– महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज