नवी दिल्ली (Swati Maliwal) : आम आदमी पक्षाच्या AAP) राज्यसभेच्या खासदार (Swati Maliwal) स्वाती मालीवाल यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Kejriwal) यांचे स्वीय सहाय्यक (PA) विभव कुमार (PA Vibhav Kumar) यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला. माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे PA विभव कुमार यांच्यावर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात मारहाण केल्याचा आरोप केला आहे. स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनी दिल्ली पोलिसांच्या पीसीआरला कॉल केला होता, त्यावर (Delhi Police) दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही.
माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना आज सकाळी 9 वाजता (CM Kejriwal) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातून 2 पीसीआर फोन कॉल आले होते. फोन करणाऱ्याने ती स्वाती मालीवाल (Swati Maliwal) असल्याचे सांगितले. फोनवर त्यांनी सीएम हाऊसमध्ये मारहाण झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र पोलीस सीएम हाउसच्या आत जाऊ शकले नाहीत. माहितीनुसार, (Delhi Police) दिल्ली पोलिसांना स्वाती मालीवाल (Swati Maliwal) घटनास्थळी सापडल्या नाहीत. वास्तविक, प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलीस सीएम हाउसच्या आत जाऊ शकत नाहीत. सध्या पोलीस पीसीआर कॉलचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
One PCR call at 9:34 AM has been recieved at PS Civil Lines from a lady saying she has been assaulted at CM House. After some time, MP Madam came to PS Civil Lines, however, she left stating she will give complaint later: DCP (North) Manoj Meena pic.twitter.com/pmOpw6rkaB
— ANI (@ANI) May 13, 2024