बुलढाणा (Buldhana):- बुलढाणा लोकसभा मतदार संघातून(Lok Sabha constituencies) सलग चौथ्यांदा निवडून आलेले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात(Union Cabinet) कार्यरत असलेले प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा सदस्यपदासाठी शपथ(oath) ही मराठीतुन (Marathi) घेतली आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, दर ५ वर्षानंतर भारतामध्ये निवडणूक होऊन नव्याने सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया होतअसते नुकतीच १७ वी लोकसभा विसर्जित होऊन १८व्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आज २४ जून रोजी लोकसभेत सदस्यपदासाठी शपथ देण्यात आली.
आपली मातृभाषा मराठीतुन घेतली मायबोलीशी असलेल प्रेम सभागृहात व्यक्त केले
२४ जून ते 3 जुलै पर्यंत १८व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन (convention)होत आहे या अधिवेशनासाठी हंगामी लोकसभा सभापती म्हणून भातृहरी मेहताब यांची निवड केली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडून आलेल्या लोकसभा सदस्यांना शपथ देण्यात आली बुलढाणा लोकसभेचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी सलग चौथ्यांदा लोकसभा सदस्यत्वपदाची शपथ हंगामी लोकसभेचे सभापती भातृहरी मेहताब यांच्याकडून घेतली ही त्यांनी आपली मातृभाषा मराठीतुन घेतली मायबोलीशी असलेल प्रेम सभागृहात व्यक्त केले सलग चौथ्यांदा निवडून आलेले प्रतापराव जाधव यांनी यांना केंद्रामध्ये सुद्धा आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून पदभार सोपविण्यात आला आहे ..
प्रतापरावांचा आमदार ते केंद्रीय मंत्री प्रवास
मेहकर विधानसभा मतदारसंघात प्रथम १९९५ आमदार म्हणून प्रतापराव जाधव निवडून आले त्यानंतर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते दरम्यान राज्य मंत्रिमंडळातही मंत्री म्हणून काम केलं बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा राखीव असताना सन २००९ हा मतदारसंघ अराखीव झाला आणि मेहकर विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला त्यामुळे २००९ ला प्रतापराव जाधव यांनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले त्यांनतर सलग चौथ्यांदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.