उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई (T20 World Cup) : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. टि-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Mumbai Police) मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
#WATCH | Mumbai: Crowd gathered at Marine Drive further swells, awaiting the arrival of Team India.
The #T20WorldCup2024 champions will have a victory parade here shortly, to celebrate their victory. pic.twitter.com/GA7ugxVA4V
— ANI (@ANI) July 4, 2024
वाहतुक आणि रस्त्यावरील गर्दीचे संनियत्रण करण्याच्या सूचना
भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) घेऊन मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पोहोचली आहे. (Indian Cricket Team) टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोष सुरु केला आहे. या (Team India Victory Procession) गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये, तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये. याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे. अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.
टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा सामना देशातील प्रत्येक नागरिकांनी पाहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो सामना पाहिला. जेव्हा भारत जिंकला, तेव्हा फार मोठा जल्लोष देशभरात पाहायला मिळाला. अनेक वर्षानंतर भारताचे स्वप्न पूर्ण झाले. आज टीम इंडिया भारतात दाखल झाली. आज अत्यंत चांगला उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज मुंबईत क्रिकेटप्रेमीच नाही तर, सर्व नागरिकांनी टीमचे स्वागत केले. लोकशाहीच्या विजयानंतर आज दुसरा विजय आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.