मुंबई (T20 World Cup) : 20-20 वर्ल्डकप क्रिकेट मधे (Team India) भारतीय संघाच्या विजयावरून विधानपरिषदेत (Legislative Councils) मोठा गदारोळ झाला. भारतीय संघाच्या विजयाचा प्रस्ताव मांडल्यानंतर बीसीए चे कोषाध्यक्ष असलेले आमदार आशीष शेलार यांचेही अभिनंदन केले पाहिजे, अशी भूमिका आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी मांडली. यावरून विरोधी पक्षाने एकच गदारोळ केला. (T20 World Cup) भारतीय संघाच्या खेळाडूंचे अभिनंदन करण्याच्या ऐवजी भाजप आशीष शेलार (Ashish Shelar) यांचे अभिनंदन करीत आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केला. या विषयावर ते बोलू इच्छित होते, मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परवानगी न दिल्यामुळे विरोधक संतापले. त्यांनी उपसभापती पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप केला.
विरोधकांच्या आरोपावर प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बीसीसीआयचे अध्यक्ष असताना शरद पवार (Sharad Pawar) यांचे अभिनंदन होऊ शकते तर आशीष शेलारांचे का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या. शेवटी (Legislative Councils) विरोधकांनी खेळाडूंचे अभिनंदन करण्याच्या ऐवजी भाजपच्या नेत्यांना अधिक प्राधान्य देत आहे, असा आरोप करीत सभात्याग केला.