नवी दिल्ली (T20 World Cup) : T20 World Cup ची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, सराव सामनेही सुरू आहेत. या (World Cup) विश्वचषकात अनेक विक्रम पाहायला मिळणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. भारतीय संघाला अमेरिकेतही फलंदाजीची धमाल दाखवायला आवडणार आहे. या (World Cup) विश्वचषकात षटकारांचा पाऊस पडू शकतो. टी-20 लीगच्या मुबलकतेमुळे फलंदाजांना आता षटकार मारण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अश्याच पाच फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
ख्रिस गेल:
वेस्ट इंडिजच्या या स्फोटक फलंदाजाचे नाव या यादीत समाविष्ट होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Chris Gayle) गेलने एकूण 33 सामने खेळताना 965 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन शतकी खेळीही आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये गेलने एकूण 63 षटकार ठोकले असून, तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्मा :
भारतीय संघाचा कर्णधार (Rohit Sharma) रोहित शर्माचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते मात्र तो गेलपेक्षा खूपच खाली आहे. गेलच्या तुलनेत रोहितचे षटकार खूपच कमी आहेत. रोहित शर्माने 39 सामन्यात एकूण 35 षटकार ठोकले आहेत. त्याने 963 धावा केल्या आहेत.
जोस बटलर :
इंग्लिश कर्णधार जोस बटलरचे नावही षटकारांच्या यादीत सामील आहे. (Jos Buttler) जोस बटलरने T20 विश्वचषकात एकूण 27 सामन्यात 33 षटकार ठोकले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 144 पेक्षा जास्त आहे. या विश्वचषकात बटलरच्या षटकारांची संख्या वाढणार आहे.
युवराज सिंग :
या यादीत आणखी एक भारतीय फलंदाज युवराज सिंगच्या नावाचाही समावेश आहे. एकाच षटकातील सहा चेंडूत षटकार ठोकणाऱ्या (Yuvraj Singh) युवराज सिंगने टी-20 विश्वचषकात एकूण 31 सामने खेळले असून, 33 षटकार त्याच्या नावावर आहेत. मात्र, युवीचा स्ट्राईक रेट 129 च्या आसपास होता.
शेन वॉटसन :
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी खेळाडू (Shane Watson) शेन वॉटसननेही येथे आपले स्थान निर्माण केले आहे. वॉटसनने T20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 24 सामने खेळले आणि 537 धावा केल्या. स्ट्राइक रेटबद्दल बोललो तर तो 141 आहे. षटकारांची संख्या 31 झाली आहे.