नवी दिल्ली (T20 World Cup 2024) : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील निराशेनंतर, (T20 World Cup) भारतीय संघाने 29 जून 2024 ऐतिहासिक ठरला. पुन्हा एकदा भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरला आणि यावेळी भारताने विश्वचषकात प्रत्येक मोठ्या संघाचा पराभव करत विश्वचषक ट्रॉफी जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी आले. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होता. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहित शर्मा म्हणाला होता की, विराट अंतिम सामन्यासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी वाचवत आहे.
भारतीय क्रिकेट गेल्या काही काळापासून शिखरावर आहे. 2023 मध्ये भारतीय संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ते पाहता यावेळी भारत विश्वचषक ट्रॉफी उचलणार, याची सर्वांना खात्री होती. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत भारत अपराजित राहिला होता. मात्र अंतिम सामन्यातील पराभवामुळे संपूर्ण भारतीय संघासह करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन दु:खी झाले होते. 2023 च्या विश्वचषकाचा (T20 World Cup) भारतीय संघ आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट संघ होता, हे सर्वांना माहित आहे.
कोहलीने आपले उद्देश स्पष्ट केले
विराटने पहिल्या चेंडूचा सामना केला, तेव्हा त्याने सीमारेषा ओलांडली. कोहलीने पुढच्या चेंडूचेही चौकारात रूपांतर केले. (Virat Kohli) कोहलीने पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकारही संपवला. अशा स्थितीत हा अंतिम सामना खेळण्यासाठी तो कोणत्या उद्देशाने आला होता, हे कोहलीने स्पष्ट केले आहे.
लागोपाठ 3 विकेट्सने टीम इंडिया अडचणी होती
पुढच्याच षटकात फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केशव महाराजच्या चेंडूवर सलग दोन चौकार मारून बाद झाला. रोहित आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेला ऋषभ पंत खाते न उघडता बाद झाला. दुसऱ्या टोकाला उभा असलेला (Virat Kohli) विराट कोहली हे सर्व पाहत होता. सलग दोन विकेट पडल्यानंतर पाचव्या षटकात सूर्यकुमारनेही आपली विकेट गमावली, यावेळी भारताची धावसंख्या 4.3 षटकांत 34/3 अशी होती.
अक्षरने अडचणीत असलेल्या संघाला सांभाळले
अशा कठीण काळात अक्षर पटेल (Akshar Patel) फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि (Virat Kohli) विराट कोहलीच्या बरोबरीने त्याने धडाकेबाज खेळी सांभाळली. भारतीय संघ प्रचंड दडपणाखाली होता, करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण पटेल आणि कोहली काही वेगळाच विचार करून आले होते. एकीकडे कोहलीने आपली विकेट वाचवत सावध फलंदाजी केली, तर दुसरीकडे अक्षर पटेल भारताची धावसंख्या वेगाने वाढवण्यात मदत केली.
विराट कोहली टॉप गियर
दुसऱ्या टोकाला (Virat Kohli) विराट कोहलीनेही 48 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. 15 षटकांनंतर भारताची धावसंख्या 118/4 होती. त्यानंतर भारताने धावफलक झपाट्याने वर नेण्यास सुरुवात केली. शिवम दुबेच्या वेगवान खेळीने विराट कोहलीनेही आपले हात उघडले. अर्धशतकानंतर कोहलीने केवळ 11 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 176 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.