अवैध वाळूसह ७ लाखाचा मुद्देमाल जप्त
परभणीतील ताडकळस पोलिसांची कारवाई
परभणी/ताडकळस (Tadaklam police action) : विना परवाना अवैध वाळू वाहतुक करणारे टिप्परताडकळस पोलिसांनी मिरखेल शिवारात रविवार १० नोव्हेंबर रोजी पकडले. पोलिसांनी वाळू साठ्यासह ७ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील काही दिवसापासून अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळूने भरलेली वाहने सुसाट धावत आहेत. रविवार १० नोव्हेंबर रोजी वाळूची अवैध तस्करी होत असल्याची माहिती ताडकळस पोलिसांना मिळाली. त्यानुसार मिरखेल ते स्टेशन रस्त्यावर एम.एच.०४ डिके – ८८४९ या क्रमांकाच्या टिप्परमधून अवैध वाळू वाहतुक केली जात होती. जवळपास ८ ब्रास वाळू साठा आढळून आला. पोलिसांनी वाळूसह टिप्पर, हेड असा एकुण ७ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोउपनि गजानन काठेवाडे यांच्या फिर्यादीवरुन माधव तातेराव काळबांडे याच्या विरुध्द ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (Tadaklam police action) गुन्ह्याचा अधिक तपास पोह पाते करीत आहेत.
ताडकळस पोलिस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूने भरलेली वाहने मुख्य रस्त्याने धावत आहेत. पोलिस व महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या डोळ्यात धुळफेक करुन वाळूमाफिया तस्करी करत आहेत. (Tadaklam police action) पोलिस प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा माफिया घेत असल्याचे दिसून येत आहे.