बुलढाणा (Buldhana):- येथील ज्येष्ठ संगीत शिक्षक संगीताचार्य रा.गो. टाकळकर गुरुजी यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई (Mumbai)यांच्यावतीने देण्यात येणारा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबईचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांची स्वाक्षरी असलेले पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे अध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांची स्वाक्षरी(Signature) असलेले पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच स्वरसाधना संगीत विद्यालयाला प्राप्त झाले. दि. २४ ऑगस्ट २०२४ शनिवारी एका विशेष समारंभात हा पुरस्कार स्व. रा.गो टाकळकर गुरुजी यांना मरणोपरांत प्रदान करण्यात येणार आहे. स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर हा पुरस्कार त्यांच्यावतीने स्वीकारतील स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी यांनी बुलढाणा शहरात संगीताच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांवर संस्कार (rites)केले. जवळपास ५० वर्ष संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केले. स्व. ला.मो पवार गुरुजी यांचे शिष्य असलेल्या टाकळकर गुरुजींनी बुलढाणा शहरात अनेक संगीताच्या मैफिलांचे आयोजन केले. संगीताच्या प्रचार व प्रचार करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.
1995 साली स्वरसाधना संगीत विद्यालयाची स्वतंत्ररीत्या स्थापना
टिळक नाट्य क्रीडा मंदिर महिला संगीत विद्यालयात अनेक वर्ष त्यांनी संगीताचे वर्ग चालवीत असतांनाच 1995 साली स्वरसाधना संगीत विद्यालयाची स्वतंत्ररीत्या स्थापना केली. स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक मान्यवर संगीत तज्ञ व संगीत अभ्यासकांच्या व्याख्यानाचे आयोजनही त्यांनी केले.गुरुजींचे अनेक विद्यार्थी त्यांचे संगीत प्रचार व प्रसाराचे कार्य देश विदेशात करीत आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना स्व. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत रत्न पुरस्काराने(Sangeet Ratna Awards) सन्मानित करण्यात येणार आहे.स्व. रा.गो.टाकळकर गुरुजी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बुलढाण्यातील संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.