चिखली(Buldana) :- शेतकऱ्यांच्या समस्या आणि व्यथा शेतकऱ्यांनी रक्ताने लिहून त्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री (Chief Minister)नामदार एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना देण्यासाठी सहकार्यासह बुलढाणा येथे एकोणावीस सप्टेंबर रोजी गेलो असता पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ तर दिलीच नाही.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची शासनाकडे मागणी
मात्र रस्त्यावर उभे राहून निवेदन देण्याची मागणी करत असताना पोलीस प्रशासनाने रक्ताने लिहिलेले निवेदन फाडून शेतकऱ्याचा अपमान केला आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घ्याव्या व मान्य कराव्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या लोकशाही मार्गाने मांडत असताना हुकूमशाही आणि लोकशाही विरोधी भूमिका निभावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा सोमवार 23 सप्टेंबर पासून चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला आहे.