परभणी (Parbhani):- येथील रेल्वेस्थानकाच्या नुतनिकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतु हे काम सुरु असतांना रेल्वे स्थानकावरील(Railway station) प्लॅट क्रमांक एक वरुन रेल्वे स्थानकात व बाहेर येण्या – जाण्यासाठी एकच मार्ग असुन अतिशय अरुंद आहे.
रेल्वे स्थानकात व बाहेर येण्या – जाण्यासाठी एकच मार्ग असुन अतिशय अरुंद
यामुळे प्रवाशांना नाहकत्रास सहन करावा लागत असून या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे वेळो वेळी करण्यात आली आहे. हि मागणी पुर्ण न झाल्यने प्रजासत्ताक दिना पर्यंत पर्यायी रस्ता न झाल्यास २७ जानेवारी रोजी रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा खा.फौजीया खान यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्याकडे केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक निधी सरकार यांना खा.फौजीया खान यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,परभणी रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम सुरु असतांनाच रेल्वे स्थानकावरील प्लॅट क्रमांक एक वरुन व रेल्वेस्थानकावरुन बाहेर व रेल्वेस्थानकाच्या आत प्रवाशांना येण्या – जाण्यासाठी पेडगावच्या दिशेने केवळ एकच मार्ग उपलब्ध आहे.
२७ जानेवारी रोजी रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलनचा इशारा
हा मार्ग देखील अतिशय अरुंद असल्याने प्रवाशांचा रेल्वेस्थानकात ये – जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रवाशांचा त्रास सहन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या बाजुच्या नविन दादर्या जवळ रेल्वेस्थानकात येण्या – जाण्यासाठी पर्यायी मार्ग करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार रेल्वे विभागाच्या वरिष्ठाकडे मागणी केली आहे. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पर्यायी रस्ता तात्काळ करावा अन्यथा २७ जानेवारी रोजी रेल्वेस्थानकात धरणे आंदोलन करण्याचा इशारा खा.खान यांनी दिला आहे.